Search AbideInSelf

Total Pageviews

Sunday, September 05, 2010

बंधू...तुला रे कसला मृत्यू! :-)

बीजातून आले फुल, फुलातून आला सुगंध;
फुल गेले कोमेजून, हा काय सुगंधाचा मृत्यू...!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

वेळूतून झाली बासरी, बासरीतून उठला नाद;
बासरी गेली तुटून, हा काय नादाचा मृत्यू....!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

आकाशात जमला ढग, ढगातून आला पाऊस;
ढग गेला बरसून, हा काय पाण्याचा मृत्यू...!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

मातीतून आली उदबत्ती, त्यातून पेटला अग्नि;
उदबत्ती गेली विझून, हा काय अग्निचा मृत्यू...!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

ऊसातून आली साखर, साखरेत आली गोडी;
साखर गेली संपून, हा काय गोडीचा मृत्यू.....!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू....!!

अन्नातून आला अन्नाचा देह,
अन्नरसाच्या गुणातून प्रकटले सत्व; 
सत्व नव्हे रे हे तर 'स्वत्व'... स्व्-तत्व!
देह-अन्न जाणारच ना रे सुकून,
पण हा काय स्वत्वाचा मृत्यू....!!! 
बंधू...तुला रे कसला मृत्यू....!!!!

जे नाहि त्याचाच रे मृत्यू,
जो आहेच त्याला कसला मृत्यू..!
जन्म-मृत्यूला जाता येता पहाणारा रे तू, 
बंधू...अरे, तुला रे कसला मृत्यू...!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!! :-)

सप्रेम
-नितीन राम
०५ सप्टेंबर २०१०
http://www.abideinself.blogspot.com/

***************