Search AbideInSelf

Total Pageviews

Monday, June 18, 2012

काय सांगु आता सदगुरुंची ख्याती...


सदगुरु आले वार करून गेले
'जे नव्हते' त्याला मारून गेले,
'जे होतेच' त्याला तारून गेले!
सदगुरु आले वार करून गेले!

सदगुरु आले वार करून गेले
प्रेमाच्या ह्त्याराला प्रेमाची धार,
प्रेमाचा वार त्यांचा....
हृदय चिरून गेले.....!

सदगुरु आले वार करून गेले
ह्त्याराला त्यांच्या दुहेरी धार,
ज्ञानाची बोथट तर प्रेमाची धार फार!
गेले ते गेले पण ह्त्यार सोडून गेले!

सदगुरु आले वार करून गेले
आभार कसे मानु त्यांचे,
सांगा उपकार कशाने मानु...?
जाता-जाता माझे सारे शब्द घेऊन ते गेले!

सदगुरु आले वार करून गेले
अंताची सुरुवात आणि
सुरुवातीचा अंत करुन गेले!

जय गुरु

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
२५ मे २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.