Search AbideInSelf

Total Pageviews

683085

Friday, May 20, 2011

भेट तुझी माझी

भेट तुझी माझी
















मित्रा, कोठे होता आत्तापर्यंत...!?
आकाश ... कोठून आले आणि कोठे जाणार...!
प्रकाश ... कोठून आला आणि कोठे जाणार...!!
सुगंध... कोठून आला आणि कोठे जाणार..!
आनंद .. कोठून आला आणि कोठे जाणार..!!
आकाशाची आकाशाला भेट...
प्रकाशाची प्रकाशाला भेट....
सुगंधाची सुगंधाला भेट.....
आनंदाची आनंदाला भेट ....
भेट तुझी माझी... ही भेट तुला तुझीच…!
भेट माझी तुझी... ही भेट मला माझीच..!

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
१५ मे २०११