Search AbideInSelf

Total Pageviews

Showing posts with label अनंत अथांग तूच रे. Show all posts
Showing posts with label अनंत अथांग तूच रे. Show all posts

Tuesday, June 26, 2012

तूच रे... तूच रे …


Picture Courtesy: Shaantanu Kulkarni

असण्याच्या अलिकडे... नसण्याच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
जीवनाच्या पडद्यावर...
तूच रे... तूच रे !

आरश्याच्या अलिकडे... आरश्याच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
क्षणिक प्रतिबिंबात...
तूच रे... तूच रे !

आकाशाच्या अलिकडे... आकाशाच्या पलिकडे
आणि दोन्ही मधल्या
नभ-रुपी देखाव्यात...
तूच रे... तूच रे !

पाटीच्या अलिकडे... पाटीच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या  
रंगीत रेघोट्यांत...
तूच रे ... तूच रे !

वातीच्या अलिकडे... वातीच्या पलिकडे
आणि ह्या दोन्हीच्या मधल्या
निर्मल प्रकाशात...
तूच रे ... तूच रे !

जाणीवेच्या अलिकडे... जाणीवेच्या पलिकडे
आणि दोन्ही मधल्या
जाणवत्या जाणीवेत...
तूच रे... तूच रे !

आधी... मधी... आत्ता... नंतर
आधीच्या आधी आणि मधीच्या नंतर

तूच रे... तूच रे तो 'कायम' !

तूच रे... तूच रे तो 'अथांग' !

तूच रे... तूच रे तो 'अनंत' !

जय गुरु

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
२५ जून २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.