एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध, अभ्यासातून झालेला बोध, शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेल मधील मेनूकार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थांची पाकक्रीया पाठ होण्यासारखे आहे. ह्यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते पण "भूक" मात्र नक्कीच भागत नाही. विविध शात्रांचा, ग्रंथांचा अभ्यास जास्तीच जास्त काय देउ शकतो तर.. पांडित्याची एखाधी मोट्ठी पदवी किंवा एखादा ज्ञानपीठ सारखा पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा. पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही... त्याने आपल्याला आपल्या 'कायम' स्वरुपाचा बोध मात्र नाही मिळत. जे बुद्धीच्या अलिकडचे आहे ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय कळणार !! "भूक" कायमची न-भागल्यामुळे, मग पांडित्याच्या आधारावर चालू राहते अजून अजून पाठांतर, अजून अभ्यास, अजून शब्दांची जमवा-जमव, विविध वैशिष्ठ्यपूर्ण मेनूकार्डचे वाचन आणि पाठांतर...आणि स्वाभाविकपणे त्याबरोबर सोबत फुकट मिळतात नव-नवीन दु:ख, नव-नवीन बंधनरूपी आभूषणे. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... वास्तविक "ज्ञान आणि अज्ञानाच्या अलिकडे व पलिकडे" असलेल्या आपल्या खर्या कायम स्वरुपापर्यंत कधीच पोचू शकत नाही. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... फक्त मूळ सदवस्तूकडे... स्वरूपाकडे निर्देष करण्यापर्यंतच कामाचे आहे हे "जाणले" तरी स्वरूपबोध "उघड होण्यास" यत्किंचीतही वेळ लागू शकत नाही.
दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध... स्वरुप-बोध... जो आहे अनायास.. आपसूक... निरावलंब... निराधार. येथे आहे सहज विश्रांती ! :-)
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
Few suggestive posts:
सत्य’ एकच आहे: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post_04.html
"बोध" म्हणजे काय...!: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
विश्रामः http://abideinself.blogspot.com/2010/10/blog-post_21.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे: http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html
बोध म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html