Search AbideInSelf

Total Pageviews

Saturday, September 17, 2011

श्रद्धा म्हणजे काय?


Picture Courtesy: Dr Vaishali Kute

























सहज जाता जाता एक दिवस वाटेत मजनू भेट्ला.
म्हणाला... लैला नसती जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, लैला असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत चंद्राची सावली भेट्ली.
म्हणाली... चंद्र नसता जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, चंद्र असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत एक पारधी भेट्ला.
म्हणाला... सावज नसते जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, सावज असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत तहान भेट्ली.
म्हणाली... पाणी नसते जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, पाणी असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत मधमाशी भेट्ली.
म्हणाली...मध नसता जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, मध असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत एक कुलूप भेट्ले.
म्हणाले... किल्ली नसती जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, किल्ली असणारच ना कोठे न कोठे...!!!

नम्र विनंती... काळजी नसावी…. ! :-)

जय गुरु

-नितीन राम
१७ सप्टेंबर २०११

http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

तो ‘तू’ नव्हे !


जे येते आणि पुन्हा जाते... ते आकाश नव्हे!
जो येतो आणि जातो ... तो प्रकाश नव्हे!

जी येते आणि जाते... ती आठवण नव्हे!
जी येते आणि जाते... ती 'साठवण' नव्हे!

जे येते आणि पुन्हा जाते... ते सुख नव्हे!
जो येतो आणि जातो ... तो आनंद नव्हे!

जो येतो आणि जातो... तो तू नव्हे!
जो येतो आणि जातो... तो तू नव्हे!

जय गुरु

-नितीन राम
१७ सप्टेंबर २०११

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!