मित्रः सत्य आणि सत्याशिवाय दुसरे काहिच नाही, पण हे होण्यासाठी 'क्षणस्थ' (ह्या क्षणात स्थित) व्ह्यायला शिकणे आवश्यक आहे. जो 'क्षणस्थ' होऊ शकला त्यालाच सत्य उमजले.
'ह्या क्षणात जगणे' (लिव्ह इन द मोमेंट) वगैरे बरेच काही बर्याच लोकांकडून आज-काल ऐकायला मिळते. पण खरी गंम्मत अशी आहे कि ह्या क्षणात जगायला शिकावे लागत नाही कारण ह्या क्षणात खरंतर आख्खे परिपूर्ण जीवनच वाहात आहे ना! ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात ह्या क्षणाच्यापेक्षा वेगळा असां कोणी उपस्थितच नाहिये... ज्याला ह्या क्षणात राहायचे आहे. हा क्षण आणि त्या क्षणात राहणारा किंवा जगणारा ह्या "द्वयीवरची श्रद्धाच" तर मूळ अडचण आहे! येथे सदैव 'दोन'चा खेळ आहे.... भास आहे. एक नाम हरी... द्वैत नाम दूरी! द्वयीवरची श्रद्धा ढळत नाहि तो पर्यंतच काहि प्रश्न कायमच भेडसावत राहतात. हे प्रश्न म्हणजे ... "मी माझे आयुष्य कसे जगू?".... "मी ह्या वर्तमान क्षणात कसे जगू?" ... "मी काय करू?" ह्या सर्व प्रश्नांच्या मूळाशी जर प्रज्ञेने पाहिले तर लक्षात येते कि येथे "मी- आगळां-वेगळा" हा मूळ भास आहे. मग हा तथाकथीत "आगळां-वेगळा असां- मी" आता जीवन जगण्याची कला शिकायला निघतो आहे.. हाच "मी" आता जीवनाशी एकरूप व्ह्यायला निघतो आहे.... हाच "मी" आता ह्या क्षणात राहायचा प्रयत्न करतो आहे. गंम्म्त आहे ना... बघां...!!! :-)
ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात अजून काहिही कमतरताच नाहिये... काहिही उणिवच नाहिये. प्रत्येक क्षण हा "परिपूर्ण जीवनच" आहे ह्या स्वानुभूतीतल्या बोधातच सर्व मोकळेपण आहे. ह्या मोकळेपणात अजून काहिही शिकण्याची, होण्याची, कोठेही पोचण्याची आवश्यकता तर सोडाच पण साधी चाहूल पण नाहिये. "येथे" कसलिही हालचालच नाहिये आणि तरिही हालचाल-युक्त जीवन आपसूक यदवत चालू आहे. :-)))
गुरु परमात्मा परेषु...ऐसा ज्याचा दृढ विश्वासु.... तेथे सर्व शक्य आहे... सर्वस्व शक्य आहे!! जय गुरु !!
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
http://www.abideinself.blogspot.com/
सत्य एकच आहे http://abideinself.blogspot.com/2011/02/blog-post_04.html