Search AbideInSelf

Total Pageviews

Friday, February 04, 2011

'सत्य' एकच आहे

‘सत्य’ एकच आहे... अभिव्यक्ती अनेक आहेत. सत्याचेच दुसरे नाव म्हणजे 'एक' किंवा त्या एकाचेच दुसरे नाव म्हणजे 'सत्य'. नांव काहिही द्या.... सत्य... स्वरुप... सर्वस्व... सदगुरु, जे कायम आहेच ते कधीही बदलु शकत नाही. ‘सत्य’ अभिन्न आहे पण त्याच्या अभिव्यक्ती फक्त भिन्न आहेत. ‘सत्य’ कायम आहे… आत्ता आहे… इथे आहे.

माझ्या दृष्टीने खरा सत्यशोधक किंवा साधक तो ज्याची 'नजर', ज्याचे 'लक्ष' सत्यावर आहे आणि ज्याची 'नजर' सत्यावर आहे त्याला कोठल्याही अभिव्यक्तीमधे "ते" सहज सापडू शकते. पण सर्व लक्ष फक्त अभिव्यक्तीवरच असेल तर, ते सुद्धा एका प्रकारचे बंधनच आहे. कोणीतरी कृष्णाची गीता वर्षोंवर्षे वाचतो आहे, कोणी तरी योग-वसिष्ठाची हजारो अनुष्ठाने करतो आहे तर कोणी ज्ञानेश्वरीची आजन्म पारयणे करतो आहे. इतके सारे करुनही जर आपण असलेल्या "ज्ञान-ईश्वराची" सत्य-नित्य... सहज ओळख जर झालेली नसेल तर त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणांचा काय उपयोग आहे हो....!!!!

ह्यालाच मी अभिव्यक्तींचे बंधन म्हणतो आहे. अनेक अभिव्यक्ती आहेत आणि नक्कीच त्या सुंदरही आहेत पण जर त्या, साधकाला 'मोकळा' करण्यासाठी त्या त्यावेळापुरत्या असमर्थ असतील तर त्याच-त्याच अभिव्यक्तींमध्ये घुटमळण्यात, अडकण्यात फारसा काही अर्थ नाही. जर कोठलीही अभिव्यक्ती, मोकळे करण्याच्या ऐवजी जर उलट अजून बांधत असेल तर ते ही एक प्रकारचे बंधनच नव्हे का ?

'सत्य' एखाद्या विशिष्ट अभिव्यक्ती मध्येच आहे हा देखील एक प्रकारचा भ्रमच आहे ना :-) ! सत्य कायमच नित्य-नूतन रुपातून अभिव्यक्त होतच राहते आणि कायम राहणारच. पण साधकाची श्रद्धा मात्र भूतकाळावर इतकी अडकलेली आहे कि त्याला वर्तमान काळावर लक्षच जात नाही. जणु काही ‘सत्य’ फक्त भूतकाळातच जीवंत होते आणि वर्तमान काळात मात्र ‘सत्य’ मेले आहे :-). साधकाची वर्तमान काळावर जशी श्रद्धा दृढ होते तशी त्याची नजर...दृष्टी वर्तमान क्षणावर स्थिर होते आणि मग वर्तमानातील अभिव्यक्तींमधे त्याला सत्याची चाहूल लागू लागते, सत्याचा सुगंध सापडू लागतो... सत्याचे दर्शन होऊ लागते. होता होता होता... जे जवळाहूनही जवळ होते आणि आहेच त्या आपल्याच सत्य-स्वरुपावर त्याचे लक्ष जाते आणि ते आपलेच सत्य-नित्य स्वरुप आपोआप आणि कायमचे..... "उघड" होते.

सप्रेम नमस्कार

जय गुरु _()_

नितीन राम
२५ जानेवारी २०११

http://www.abideinself.blogspot.com/

Few suggestive posts:
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे: http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
विश्रामः http://abideinself.blogspot.com/2010/10/blog-post_21.html
"बोध" म्हणजे काय...!: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
"बोध" म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html


17 comments:

Anonymous said...

Agreed - ultimate truth cannot be different or separate from the trueness of every moment.

-Sanjay S

Anonymous said...

"Though cant follow rest of marathi ... "Satya ekach Aahe" is enough :)"

-Subbu

Anonymous said...

"Complicated but nice"

-Niranjan Kulkarni

Anonymous said...

"Class"

-Prasad Mahadik

Anonymous said...

"'सत्य' एखाद्या विशिष्ट अभिव्यक्ती मध्येच आहे हा देखील एक प्रकारचा भ्रमच आहे ना
:-) !
.
.
.
:-)"

-Sarang

Nitin Ram said...

Thanks everyone :-)

Stay tuned...

Anonymous said...

Dear Nitin.

"Truth and Nothing but the Truth "

"Satya and Satyashivay Dursra Kahich Nahi"

Pan he honyasathi "Xanastha" ( Ya Xanat Sthit ) vhyayla shikne avashyak ahe, Jo "Xanastha"
Hou shakla, tyalach Satya Umjle.

Thank You

Best Regards,

Avinash

Anonymous said...

Dear Nitin,
I can only say it is an excellent way of putting things correctly.
Expressions are many the absolute is only one.
Regards

-Hrishikesh

Nitin Ram said...

धन्यवाद अविनाश,

ह्या क्षणात स्थित होणे नक्कीच शक्य आहे पण मग तरिही अडचण काय बरं येते...! ह्या क्षणावर विश्वास, श्रद्धा... आहे कोठे..! आणि सत्यच नव्हे तर सर्वच आत्ता ह्या क्षणात आहे.... श्वास... स्पंदन.... आपण असल्याची स्पष्ट जाणीव... जगण्याची आशा ... जीवन... ! हा क्षण परिपूर्ण आहेच पण त्यावर श्रद्धाच नाहि म्हणून तर सारखे सारखे भूत आणि भविष्यामधे बागडणे होते आहे. 'ह्या क्षणात जगणे' (लिव्ह इन द मोमेंट) वगैरे बरेच काही बर्‍याच लोकांकडून आज-काल ऐकायला मिळते. पण खरी गंम्मत अशी आहे कि ह्या क्षणात जगायला शिकावे लागत नाही कारण ह्या क्षणात खरंतर आख्खे परिपूर्ण जीवनच वाहात आहे ना. ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात ह्या क्षणाच्यापेक्षा वेगळा असां कोणी उपस्थितच नाहिये... ज्याला ह्या क्षणात राहायचे आहे. हा क्षण आणि त्या क्षणात राहणारा किंवा जगणारा ह्या "द्वयीवरची श्रद्धाच" तर मूळ अडचण आहे! येथे सदैव 'दोन'चा खेळ आहे.... भास आहे. एक नाम हरी... द्वैत नाम दूरी! द्वयीवरची श्रद्धा ढळत नाहि तो पर्यंतच काहि प्रश्न कायमच भेडसावत राहतात. हे प्रश्न म्हणजे ... "मी माझे आयुष्य कसे जगू?".... "मी ह्या वर्तमान क्षणात कसे जगू?" ... "मी काय करू?" ह्या सर्व प्रश्नांच्या मूळाशी जर प्रज्ञेने पाहिले तर लक्षात येते कि येथे "मी- आगळां-वेगळा" हा मूळ भास आहे. मग हा तथाकथीत "आगळां-वेगळा असां- मी" आता जीवन जगण्याची कला शिकायला निघतो आहे.. हाच "मी" आता जीवनाशी एकरूप व्ह्यायला निघतो आहे.... हाच "मी" आता ह्या क्षणात राहायचा प्रयत्न करतो आहे. गंम्म्त आहे ना... बघां...!!! :-)

ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात अजून काहिही कमतरताच नाहिये... काहिही उणिवच नाहिये. प्रत्येक क्षण हा "परिपूर्ण जीवनच" आहे ह्या स्वानुभूतीतल्या बोधातच सर्व मोकळेपण आहे. ह्या मोकळेपणात अजून काहिही शिकण्याची, होण्याची, कोठेही पोचण्याची आवश्यकता तर सोडाच पण साधी चाहूल पण नाहिये. "येथे" कसलिही हालचालच नाहिये आणि तरिही हालचाल-युक्त जीवन आपसूक यदवत चालू आहे. :-)

सप्रेम नमस्कार

"बोध" म्हणजे काय...!
http://abideinself.blogspot.com/2011/02/blog-post.html

Anonymous said...

THANK YOU SO MUCH, NITIN.

-K.D.SAMANT

Mahesh Palimkar said...

Apratim... ase khup divasatun vachayala milale... sundar.

Jaya-Mohan said...

Dear Nitin,

"धन्यवाद अविनाश,

ह्या क्षणात स्थित होणे नक्कीच शक्य आहे पण मग तरिही अडचण काय बरं येते...! ह्या क्षणावर विश्वास, श्रद्धा... आहे कोठे..! आणि सत्यच नव्हे तर सर्वच आत्ता ह्या क्षणात आहे.... श्वास... स्पंदन.... आपण असल्याची स्पष्ट जाणीव... जगण्याची आशा ... जीवन... !"
.
.
.
ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात अजून काहिही कमतरताच नाहिये... काहिही उणिवच नाहिये. प्रत्येक क्षण हा "परिपूर्ण जीवनच" आहे ह्या स्वानुभूतीतल्या बोधातच सर्व मोकळेपण आहे. ह्या मोकळेपणात अजून काहिही शिकण्याची, होण्याची, कोठेही पोचण्याची आवश्यकता तर सोडाच पण साधी चाहूल पण नाहिये. "येथे" कसलिही हालचालच नाहिये आणि तरिही हालचाल-युक्त जीवन आपसूक यदवत चालू आहे. :-)"


Aprateem, ha Kshana Vilakshana. Love.

Jaiguru.

Santosh Dubal said...

superb dear...
very love u ...
regards..

Sanjiv said...

Excellent
Beyond words

thank you so much nitin.

Sujata Shashank Phadke said...

खुप सुन्दर...आपण असलेल्या "सत्य ..नित्य ''' ईश्वराची ओळख् जर झाली नसेल तर वर्षानुवर्षे केलेल्या" साधनेचा ''' उपयोग काय?????

Sujata Shashank Phadke

Anonymous said...

अतिशय सुंदर.... ♥

Nitin Ram said...

Thanks.... Jai Guru