Search AbideInSelf

Total Pageviews

Tuesday, July 19, 2011

सहज योग

सहज योग

बर्फ वितळल्यावर पाण्याला, वाहायला शिकवावे लागते.....?
उकळत्या पाण्याच्या वाफेला, पसरायला शिकवावे लागते....?
धुंद वारा आल्यावर पानांना, हालायला शिकवावे लागते....?
पावसाचे थेंब प्यायला, जमिनीला कधी शिकवावे लागते...?
फुल उमलल्यावर, सुगंधाला दरवळायला शिकवावे लागते...?
ठिणगी पडल्यावर, भुस्स्याला पेटायला शिकवावे लागते....?
प्रेमातून प्रेम निर्माण करायला, प्रेमाला शिकवावे लागते...?  :-)

सप्रेम
-नितीन राम
१८ जुलै २०११
जेथे ओळख पटली तेथे ओळख संपली.