Search AbideInSelf

Total Pageviews

Friday, August 10, 2012

'कृष्ण' भेटला …तर काय करणार ?

कृष्ण-जन्माष्टमी निमीत्त.....
कृष्ण भेटला …तर काय करणार ?

त्याला ओळखणार तरी का?
कसे काय ओळखणार त्याला??
का कृष्णालाच... कृष्णाचा पत्ता विचारणार ????  
त्याची गरजच नसेल तर ओळख कशी पटणार
आणि कशाला पटणार बरे ?

कोठला मापदंड वापरणार त्याला ओळखायला? कोठली व्याख्या-सूत्र वापरणार त्याला ओळखायला?? कोठल्या फूट-पट्टीने मोजणार त्याला आणि कसे मोजमाप करणार त्याचे? कोठ्ल्या तराजूवर तोलणार त्याला आणि कोठल्या चश्म्यातून पाहणार त्याला?? त्याने लिहिलेली पुस्तके मोजणार का त्याला मिळालेले पुरस्कार तपासणार? त्याचे वय, जात, कुळ विचारणार का त्याचा वर्ण आणि धर्म तपासणार???


त्याचे शिष्यगण मोजणार का त्याचे आश्रम मोजणार?? त्याचे चमत्कार शोधणार का त्याचे वर्तन तपासणार?? त्याला श्री परशुरामाचे प्रवचन ऐकवणार का त्याला रामायण वाचायला देणार???
त्याने उघडलेल्या शाळा आणि हॉस्पिटल्स मोजणार का त्याचे समाजोपयोगी योगदान तपासणार? त्याला पतंजली योगाच्या शिबीराला बोलावणार का उपनिषदावरील व्याख्यानाला बोलावणार..??? त्याला 'योग-वसिस्ठ'' ग्रंथाची प्रत वाचायला देणार का त्याला 'अबकड्'च्या सत्संगाला बोलावणार?????

जो तुमच्या बुद्धीच्या व्याख्येत बसेल तो तुमच्या पेक्षा छोटा असणार ना?????? का नाही??? :-) पण जर हृदयातला कृष्ण जागा असेल तर समोरच्या देहधारी कृष्णाची ओळख तत्क्षण पटणार, जशी राधेला पटली ... अर्जुनाला पटली... उद्धवाला पटली... अगदी तशीच...! मग आपल्याला आपली सत्य-नित्य ओळख देखील नक्की पटणार ... आपल्याला आपल्याच अनंत...विदेही कृष्णरुपाची ओळख... जशी राधेला... अर्जुनाला... उद्धवाला पटली....अगदी तशीच!!! देहधारी कृष्ण म्हणजेच देहधारी सखा, मित्र....सदगुरु...सिमीत देहातील असीम विदेही... जसे काळ्या-निळ्या ढगामधले अनंत आकाश...! ज्याला त्याची खरी तहान लागते त्याला तो भेटल्याशिवाय रहात नाही... राहू शकत नाही... कधीही राहिलेला नाही! :-)! गुरुद्वार नक्की सापडते...प्रेमचक्षूंच्या द्वारातून! सप्रेम शुभेच्छा!

सप्रेम नमस्कार

जय गुरु

नितीन राम
०९ जून २०१२

www.abideinself.blogspot.in
जेथे ओळख पटली, तेथे ओळख मिटली.