Search AbideInSelf

Total Pageviews

Wednesday, February 09, 2011

दु:खके सब साथी... सुखमे न कोई :-)

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
इथे फारशी कोणाला त्याची गरज असत नाहि.
तहान लागलेली नसताना मिळालेले पाणी कोणाच्या बरे कामाचे!

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
दु:खाची सवय असलेल्यांना, दु:खच जास्ती ओळखीचे असते.
द:खात रमलेल्यांना 'सुख', उलट जास्ती दु;खी करते.
आणि मग त्यांचे दु:ख तुम्ही पाहू शकणार नाही.

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
ज्याला पाहिजे आहे तो आपोआप येतो आणि घेउन जातो.
घेणारा आणि देणारा सुखरुप होतात....
घेणारा भरून जातो तर देणारा हलका :-).

सर्व साथी दु:खातलेच, साथ म्हणजे दोन... द्वैत!
द्वैतातले सुख काय आणि दु:ख काय...
एकाच नाण्याच्या दोन बाजू!
पण “वास्तविक सुख” (आनंद) ते आहे ज्यात द्वैत नाही...
दु:खतर नाहिच पण सुख पण नाही. येथे दोन्हीला थारा नाही...
येथे 'दोन'ला बिलकुल थारा नाही.
येथे दु:खाची चिंता नाही आणि सुखाची अपेक्षा पण नाही.
येथे सुखाची अपेक्षा असलेला असा कोणीच वेगळा नाही,
मग येथे 'सुख' जाणवणार तरी कोणाला!
येथे आहे अद्वैतानुभुती, द्वैतामध्येच राहून... अद्वैतानुभुती.
येथे आहे समाधान... अनायास समाधान.
येथे आहे … अकारण आनंद. येथे आहे शब्दातीत असे.... सर्वस्व :-) !

दु:खके सब साथी... सुखमे न कोई  :-)

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
ज्याला पाहिजे आहे तो आपोआप येतो आणि घेउन जातो.
घेणारा आणि देणारा सुखरुप होतात....
घेणारा भरून जातो तर देणारा हलका :-).

सप्रेम _()_

-नितीन राम

१६ नोव्हेंबर २०१०

साथी: http://abideinself.blogspot.com/2008/04/blog-post_16.html

6 comments:

Anonymous said...

Amazing insight!

-Shripad Torvi

Nitin Ram said...

The one who finds this insight amazing.... is really Amazing & Rare!
Thanks Shripad :-)

Santosh Kunte said...

"अकारण आनंद" (Causeless Joy/Contentment), mind can not conceptualize it; doesn't mean that causeless joy doesn't exist, it does exist but only the mind can not manufacture it. It exists by the grace of itself, its like a flame, ever glowing!"

Nitin Ram said...

येथे आहे अद्वैतानुभुती, द्वैतामध्येच राहून... अद्वैतानुभुती. येथे आहे समाधान... अनायास समाधान. येथे आहे … अकारण आनंद. येथे आहे शब्दातीत असे.... सर्वस्व :-) ! जे मनाशिवाय आहे... ज्याचा मनाशी अथवा बुद्धीशी कोठलाही संबंध नाही. मनाची हद्द, बुद्धीची हद्द जेथे संपते तेथे ह्या आनंदाची सुरुवात आहे. आणि ह्या सुरुवातीला कोठलाही अंत नाहिये ही खरी गंम्मत आहे :-)

Ramkrishna said...

Dear Nitin,

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा. इथे फारशी कोणाला त्याची गरज असत नाहि. तहान लागलेली नसताना मिळालेले पाणी कोणाच्या बरे कामाचे!

YAHA JO VIDYA HAI JO AKELEME AKELEKO DI JATI HAI

-from Tapasibaba quotes

Nitin Ram said...

Thanks Ram :-) I appreciate your intelligence. You know a lot and many quotes and many scriptural references. I admit to be an ignorant. With the grace of the SatgGuru I never read any scriptures or such things but with the same grace of satGuru I can never ever say that any of those scriptures are not written by me. Whatever is said HERE is from the discovered undeniable experiential reality, as you are already aware of my scriptural ignorance.

The essence ALWAYS get lost or overlooked while one is so engrossed n enmeshed in collected information (which is assumed as knowledge) through scriptures, without own experiential cognition.

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा. दु:खाची सवय असलेल्यांना, दु:खच जास्ती ओळखीचे असते. द:खात रमलेल्यांना 'सुख', उलट जास्ती दु;खी करते. आणि मग त्यांचे दु:ख तुम्ही पाहू शकणार नाही.
.
.
.
सर्व साथी दु:खातलेच, साथ म्हणजे दोन... द्वैत! द्वैतातले सुख काय आणि दु:ख काय... एकाच नाण्याच्या दोन बाजू! पण “वास्तविक सुख” (आनंद) ते आहे ज्यात द्वैत नाही... दु:खतर नाहिच पण सुख पण नाही. येथे दोन्हीला थारा नाही... येथे 'दोन'ला बिलकुल थारा नाही. येथे दु:खाची चिंता नाही आणि सुखाची अपेक्षा पण नाही. येथे सुखाची अपेक्षा असलेला असा कोणीच वेगळा नाही, मग येथे 'सुख' जाणवणार तरी कोणाला! येथे आहे अद्वैतानुभुती, द्वैतामध्येच राहून... अद्वैतानुभुती. येथे आहे समाधान... अनायास समाधान. येथे आहे … अकारण आनंद. येथे आहे शब्दातीत असे.... सर्वस्व :-) !

दु:खके सब साथी... सुखमे न कोई :-)

Thank you so much.

With Love n Regards,