Search AbideInSelf

Total Pageviews

Wednesday, February 02, 2011

"बोध" म्हणजे काय...!

आत्मबोध


बोध म्हणजे नक्की काय ? बोध म्हणजे अभ्यास का ?

बिलकूल नाही. अभ्यास म्हणजे फार फार तर बोधाचं खोटे नाणे!
अभ्यास म्हणजे वर वर वाटतो, बोधा जवळ जायचा प्रवास
पण वास्तविक दृष्ट्या मात्र ठरतो बोधापासून लांब पळायचा प्रयास.

'अभ्यास' म्हणजे... बोधाचा फक्त आभास, तर
'बोध' म्हणजे... सतत, सहज, अनायास असा ... "आत्मबोध" !

'बोध' म्हणजे... शोधाचा कायमचा अंत आणि शोध घेणार्‍याचाही अंत.
'बोध' म्हणजे... शोध आणि शोधणारा ह्या द्वयीचा अंत.
'बोध' म्हणजे... दु:खाचा अंत आणि सुखाचाही अंत.
'बोध' म्हणजे... कोठल्याही पाठाचा अंत आणि पाठ करणार्‍याचाही अंत.
'बोध' म्हणजे... आरंभाचा अंत आणि अंताचाही अंत.
'बोध' म्हणजे... जन्म आणि मृत्यू ह्या संकल्पनेंचा कायमचा अंत.
'बोध' म्हणजे... अभ्यासाचा अंत आणि अभासकाचाही अंत.
'बोध' म्हणजे... द्वैताचा अंत नव्हे तर... द्वैत धारणेवरील श्रद्धेचा अंत.
'बोध' म्हणजे... जे काही... 'कळले' असे वाटते आहे त्याचा अंत.
'बोध' म्हणजे... ग्रंथ, वचने... पुस्तके, शब्द असल्या कोठल्याही आधारांचा अंत.
'बोध' म्हणजे... आपल्याच अनंत आणि निराधार स्वरुपाचा बोध... आत्मबोध!
'बोध' म्हणजे... कोठल्याही पाढ्याशिवायचा.... शून्याच्या पाढ्यासारखा बोध :-)

जय गुरु

-नितीन राम
२७ डिसेंबर २०१०

http://abideinself.blogspot.com/2009/11/blog-post_23.html
जेथे ओळख पटली... तेथे ओळख मिटली.



*Also read:
बोध: http://abideinself.blogspot.in/2009/11/blog-post_19.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html
बोध म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html

6 comments:

Anonymous said...

superb...extremely straigtht , extremely subtle,
no excuses..
thanks..
...much love ;;

-Santosh Dubal

Anonymous said...

Wow, Excellently put ! - if understanding is not here & now, living, continuous and real then it remains a mentation / thought - however subtle..

Regards,

-Sanjay Shirole

Anonymous said...

Dear Nitin,

The message is wonderful!
Thanks for the note on Bhodh.

Regards,

Prabhu

Anonymous said...

Dear Nitin,

Saral aani subodh, jo Abhyasane navhe tar Adhyasane yeto.
love & regards, Jai guru.

-Jaya-Mohan

Anonymous said...

नितिन,

नमस्ते.
तुम्ही लिहिलेला 'बोध' पूर्णपणे समजला आणि तो पटला.
शेवटी बोध म्हणजे शून्यत्व! आणि आपण आतल्या प्रकाशातून लिहिले आहे त्यामुळे त्यातली प्रत्येक ओळ, त्याच योग्यतेची आहे. आपल्या अंतरंगातून नवा निसर्गदत्त उलगडला जावा ही परम्यात्म्याकडे प्रार्थना! आपल्या सर्व कुटुंबियांना सप्रेम.

-काका
०३ फेब्रुवारी २०११

Nitin Ram said...

:-) Thanks everyone...

Love n Regards