Search AbideInSelf

Total Pageviews

Showing posts with label निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये. Show all posts
Showing posts with label निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये. Show all posts

Tuesday, July 13, 2010

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।

योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥

देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।

तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥

अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।

सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥३॥

 
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।

तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥


पुरे पुरे आतां प्रपंचा पाहणें ।

निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥

ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।

विठ्ठलीं निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥