Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, November 21, 2013

इश्क खुदा-का नाम है!

Picture Courtesy: www.crazymessybeautiful.com
Whatever the Question, Love is the Answer.

इश्क... गुरु-का नाम है, 
इश्कमे जिंदगी ही देख!

इश्क... खुदा-का नाम है, 
इश्कमे जिंदगी तू देख!

इश्क... फना-का नाम है, 
इश्कमे जिंदगी तू देख!

जय गुरु

नितीन राम
२१ नोव्हेंबर २०१३

(Post inspired from: Jigar Moradabadi)

Wednesday, November 20, 2013

How can an illusion touch "YOU?

Stare At The Middle For A Change In Color
Can anyone be
happy forever,
by making
smarter corrections
in an illusion? ;-)

The best way 
to enjoy 
the illusion
is to RECOGNIZE
that
it's an illusion! Lol

YOU are 
beyond illusion!!

How can an illusion
ever touch 'YOU'?

Nitin Ram
abideinself.blogspot

'माया' म्हणजे काय? (What is illusion?)

जिथे पहावे तिथे,
धावपळ करणारे जिवंत मुर्दे!
The living dead are 
running around everywhere.

मुर्दे असूनही मृत्यूला घाबरतात...
काय आश्चर्य आहे ना......!!!!?
How amazing that 
the dead are scared of the death!!?

"जे कायम आहेच" ते, त्यांना....
कान असून ऐकू येत नाही...
डोळे असूनही दिसत नाही...!
They can not hear with ears,
can not see with eyes...
"What Is" Here & Now!!

सारे मुर्दे आपल्याच धुंदित,
आपल्याच बेहोशीत...
'ओळखीच्या बंधनांमध्ये'...
एकदम खुश आहेत...!
All of them are so engrossed
in their concepts of the Truth,
unaware of even their un(consciousness)!

अनोळखी मुक्तीपेक्षा,
ओळखीचे बंधन... हवेहवेसे वाटते.
ह्याचेच नाव.... "माया"!
Known bondage
appears to be comfortable 
than the Unknown Freedom!!!
This is 'Maya'... This is Illusion!

Jai Guru  

Nitin Ram
11 August 2013

www.abideinself.blogspot.in

Related Posts:

Death is the Fallacy:
http://abideinself.blogspot.in/2010/05/death-is-only-fallacy.html

बंधू... तुला रे कसला मृत्यू!!
http://abideinself.blogspot.in/2010/09/blog-post_05.html

Life is an illusion, beyond doubt, beyond belief!
http://abideinself.blogspot.in/2012/04/life-is-illusionbeyond-doubt-beyond.html

मूळ स्वप्न कोणते?* (*फक्त प्रौढांसाठी)
http://abideinself.blogspot.in/2011/12/blog-post.html

Friday, November 08, 2013

आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू!

आस्तिक आणि नास्तिक... दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू. वरवर दिसायला विरोधपूर्ण वाटतात आणि म्हणून तर ह्यांमध्ये एवढे विवाद आणि संघर्ष.J आस्तिक आणि नास्तिकामधील भांडण हे असे.... पहां… 
दोन लहान मुली छानपैकी भातुकली खेळत आहेत आणि अचानक दोघींमध्ये भांडण सुरु झाले... भांडण आणि रडारड ऐकून आई धावत आली. म्हणाली अगं काय झाले, का भांडत आहात? एक मुलगी म्हणाली दुसरीने माझ्या बाहुलीला थप्पड मारली. दुसरी मुलगी तत्काळ म्हणाली कि हो मी थप्पड मारली कारण ही माझ्या बाहुलीला दुष्ट म्हणाली. आई ह्या दोघींकडे पहात राहीली आणि म्हणाली अगं पण तुमच्या दोघींच्या हातामध्ये तर काहीच नाहीये... कोठे आहेत तुमच्या दोघींच्या बाहुल्या? दोन्ही मुलींने आप-आपल्या हातात धरलेल्या 'काल्पनिक' बाहुल्या आईला दाखवल्या. आईने हसून दोघींच्या बाहुल्यांना 'काल्पनिक' चॉकलेट्स दिली आणि दोन्ही मुली खुश होऊन पुन्हा एकदा भातुकली खेळायला लागल्या... Lol जसे हे भातुकलीमधली भांडण म्हणजे लहान मुलांचा लहानपणीचा खेळ तसाच मोठ्यामुलांचा मोठ्यापणीचा 'आस्तिक-नास्तिक' भांडणाचा खेळ आहे कि काय!? J

आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू. आस्तिकाची 'देवा'वर श्रद्धा आहे तर नास्तिकाची 'मी'वर (स्वतःच्या मन-बुद्धीवर). म्हणजे एकूणच कशावर तरी श्रद्धा आहेच ना? दुसर्‍या अंगाने पाहिले तर आस्तिकाचा 'मी'वर संशय आहे आणि नास्तिकाचा 'देवा'वर. म्हणजे कशावर तरी संशय आहेच ना? पण ही श्रद्धा किंवा हा संशय ज्याच्या-त्याच्या 'मी' आणि 'देव' ह्यांच्या व्याख्यांवर अवलंबून आहे ना??? मग ह्या दोन्हीच्या मानलेल्या व्याखातरी काय आहेत? सामान्यतः दिसून येते ती 'मी'ची व्याख्या म्हणजे 'मन-बुद्धी-देहरुपी आकार म्हणजे मी' आणि देवाची व्याख्या म्हणजे 'साकार व्यक्तीरेखा'  (उदा.: जीसस, राम, कृष्ण, महावीर, बुद्ध इत्यादी). पण 'मी' आणि 'देव' ह्या दोन संज्ञा म्हणजे खरोखरीच मी किंवा देव आहेत का आणि त्या एकमेकांपासून खरंच भिन्न/वेगळ्या आहेत का??


'मी' आणि 'देव' हे दोन शब्दप्रयोग म्हणजे १६ तासाच्या जागेपणीच्या स्वप्नामधील दोन 'उपयुक्त' मान्यता, कल्पना, आधार ... गृहीतक (हैपॉथेसिस). जसे पहिलीमधील मुलाला 'ग' शिकवण्यासाठी 'ग'णपतीचे चित्र दाखवतात ना तसे. पण मग ह्या दोन्हीही मान्यता कशा काय?? मान्यता म्हणजे मानलेल्या... मानलेल्या म्हणजे मनावर आधारीत... मन आहे म्हणून मान्यता... पण हे 'मन' निर्मीत कधी झाले ते तरी पहा. जन्म झाल्या-झाल्या हे 'मन' उपस्थित होते का?? दोन-तीन वर्षांपर्यंत मनाची निर्मीती झालेली नव्हती ना आणि म्हणूनच ह्या दोन्ही (मी किंवा देव) मान्यतांची/आधारांची निर्मीतीही झालेली नव्हती कारण त्यांची तोपर्यंत गरजही नव्हती. आणि तरीही ह्या दोन्ही मान्यतांच्या अनुपस्थितीमध्येही त्या दोन-तीन वर्षांच्या देहाला आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पुरवठा आपसुक होत होताच ना... का नाही?? J

कोठलिही कल्पना...गृहितक वापरून 'बंधनाच्या मूळ कल्पनेचा' समूळ नाश होणे महत्त्वाचे. स्वतःला स्वतःची ओळख होणे महत्त्वाचे. स्वतःची मानलेली खोटी ओळख मिटून खरी ओळख होणे महत्त्वाचे. 'मी' कोण आहे हे जाणणे महत्त्वाचे. कारण मनुष्याचे सर्व वाद-विवाद, दुखः, चिंता, भय त्याच्या स्वतःबद्दलच्या मानलेल्या कल्पनेवर आधारित आहेत. म्हणूनच कोठलेही धारणा वापरून "आपल्याच निर्गुण, निराकार, निराधार, अद्वैत स्वरुपाची ओळख झाली" कि झालेना काम!! ज्याची-त्याची आवड, नैसर्गिक रुची, ओढ इतकेच! ८ तासाच्या झोपेमध्ये ह्या दोन्हीही कल्पनांचा नुसताच अभाव नसतो तर त्यांची आठवण किंवा गरज पण भासत नाही आणि तरीही हेच झोपेचे ८ तास प्रत्येकाला जागेपणीच्या १६ तासांपेक्षाही हवे-हवेसे वाटतात का नाही? हा आस्तिकाचा आणि नास्तिकाचाही रोजचा अनुभव आहे ना? J

"तुमची देवावर श्रद्धा आहे का?" ह्या प्रश्नाला
तत्क्षण आस्तिक 'हो' उत्तर देतो तर नास्तिक 'नाही' म्हणतो. पण ह्या दोघांचीही ही उत्तरे आप-आपल्या वैयक्तीक व्याख्यांवर/मान्यतांवर अवलंबून आहेत ना हो!!!! मग दोघांमध्ये खरच गुणात्मक काही फरक आहे का?? कारण दोघांचीही आपल्या 'वेगळेपणावर'/ द्वैतावर श्रद्धा आहे. आपण समग्र अस्तित्वाच्यापेक्षा (Existential Reality/ Non-dual Existence/ God) 'वेगळे' आहोत, आपण फक्त ‘मन-बुद्धी-'देह' रुपी आकार आहोत ह्यावर श्रद्धा आहे आणि म्हणून तर दोघेही सुरुवातीला बंधनातच आहेत. सुख-दुखःच्या भोवर्‍यातच अडकले आहेत कारण दोघेही 'वेळ आणि अवकाश' (Concept of Time & Space) ह्या संकल्पनांच्या बंधनातच आहेत. J

मात्र ज्याला आपण भोवर्‍यात अडकलेले आहोत हे कळायला लागते तेव्हा खरा शोध आणि प्रवास सुरु होतो. ज्याच्याकडे नैसर्गिकरित्या जे-जे भांडवल असते ते उपयोगाला आणले जाते. “श्रद्धा किंवा संशय” ही दोन प्रमुख भांडवले. ह्या दोन भांडवलांमध्ये भांडण असण्याचे खरे तर काही कारणच नाही.
एक नक्की की हा आस्तिक-नास्तिकमधील ह्या दोघांमधला संघर्ष नसून तो ह्या प्रत्येकाच्या अंतरंगात उपस्थित द्वैतभावाशी असलेला संघर्ष आहे म्हणजे स्वतःच्याच कल्पनेशी संघर्ष आहे ना! जो पर्यंत ह्या दोघांमधेही द्वैतभावावर श्रद्धा आहे तो पर्यंत संघर्षहीन सहज, सरल, अद्वैत्-बोध होणे शक्य नाही... हे नक्की. J

आस्तिक आणि नास्तिक... एक जण पूर्वेकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करू पहात आहे तर दुसरा पश्चिमेकडून...! पोचणार दोघेही... फक्त स्वतःकडे आत्यंतिक प्रामाणिकता आणि कळकळ हवी. “श्रद्धा आणि संशय" हे जसे जपाच्या एकाच माळेतील एका मागे एक फिरणारे दोन मणी आहेत. कोठला मणी कशाच्या मागे फिरला तरी जपामध्ये काय फरक पडतो ??? कधीतरी दोन्ही मण्यांच्यामधून ओवला गेलेल्या स्तब्ध दोर्‍याकडे (अद्वैत तत्त्वाकडे) लक्ष जाइलच ना! "श्रद्धा आणि संशय" ह्या जणू नोटांच्या बंडलामधील दोन नोटा आहेत ज्या त्यावेळेपुरत्या कामचलाऊ आहेत पण सदवस्तुची (बोध) खरेदी होणे महत्वाची मग कोठ्ल्या नोटेने सदवस्तू प्राप्त झाली हे गौण आहे. “श्रद्धा आणि संशय” म्हणजे जणू दोन जुळी भावांडे आहेत ज्यांचे 'आई-वडील' "एकच" आहेत. पाण्यातील नाव/होडी एकाच वल्ह्याने पुढे जाईल का... कधी किनारा पार करेल का? तिला कदाचित पुढे जाण्याचा भास होऊन ती जागच्या जागीच गोल्-गोल फिरत बसेल ना? J

नदीचे जसे दोन किनारे तसे “श्रद्धा आणि संशय” हे दोन घाट जे वर-वर दिसायला परस्पर विरोधी दिसतात पण खरे तर परस्पर्-पूरक आहेत. नदीचे सर्व पाणी जेव्हा ओसरून जाते तेव्हा 'हा काठ' आणि 'तो काठ' ह्या कल्पानाही ओसरून जातात ना... का नाही? नदीमध्ये पाणी नसताना 'दोन' हा विषयच उरत नाही आणि 'एक' ह्या कल्पेनेचीही आवश्यकता भासत नाही. कोठल्याही घाटावरून नदीमध्ये उतरता येतेच ना...? नक्कीच येते पण सुरुवात कोठ्ल्याही घाटावरून झाली तरी काठ (कल्पना) सुटल्याशिवाय नदीमध्ये मुक्तपणे पोहता येइल का...? काठ (कल्पना) स्थिर आहेत तर नदी (जीवन) प्रवाहीत आहे.... कोठलाही काठावरील हात सुटल्याशिवाय पोहता येणे शक्य नाही. काठावरचा आपला हात घट्ट पकडून नदीच्या पाण्यामध्ये पाय मारत बसणे ह्याला अभ्यास म्हणतात.... आधारीत अभ्यास. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत हा आवश्यकच आहे.

ज्याला खरच पोहायला शिकायचे आहे त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार, निष्णात पोहणारा मार्गदर्शक (सदगुरु) नक्कीच भेटतो. पण पुन्हा व्याख्येच्या गोंधळापायी जर कोणाला त्याची (गुरु शब्दाची) ऍलर्जी असेल तर, "आध्यात्मामध्ये गुरुची बिलकूल गरज नाही" असे सांगणारा तरी कोणी गुरु नक्कीच भेटतो. सर्व गोंधळ शब्दांचा आणि त्यामध्ये मनाने भरलेल्या शब्दार्थांच्या मसाल्याचा (व्याख्खेचा)... आपल्या मनाते जे आहे, आपले लक्ष जेथे आहे ते आपल्याला दिसणार हे निश्चीत. Lol

अभ्यास/ साधना म्हणजे बोधापर्यंत पोचण्याची पूर्व तयारी आहे. पण जन्मभर फक्त अभ्यासच करत बसणार का हो का काठावरचा हात सुटुन बोधप्राप्ती करून घेणार??? अभ्यास पूर्ण झाला की आधारांची गरज लागत नाही ना! रांगणार्‍या बाळाला चालायला शिकवण्यासाठी 'पांगुळगाडा' (Walker) दिला जातो. चालायला लागल्यावर तो पुन्हा वापरला जातो का?? पोहायला शिकताना कंबरेला हवा भरलेली ट्यूब बांधली जाते. पोहायला आल्यावर तीच ट्यूब निरर्थक होते ना! मग उरते मुक्त पोहणे... सुख-दुखः विरहीत मुक्त जीवन! पण जेव्हा पोहता यायला लागते (आपल्याच निराधार स्वरुपाचा सत्य-नित्य बोध होतो) तेव्हा काठावरचा हात सहज सुटून जातो (वेगळेपणाच्या कल्पनेचा र्‍हास होतो) तेव्हा 'उमजते' कि काठांविषयीची भांडणे हा केवळ पोरखेळ होता आणि पोरखेळातच बरेच आयुष्य उगीच वाया गेले.

श्रद्धा असो वा संशय दोन्हीपैकी कोठलेही जर १००% उपस्थित असतील तर 'बोध' तात्काळ आहे परंतु आजच्या काळात तुकारामांसारखा अढळ श्रद्धा असणारा भक्त किंवा शंकराचार्यांसारखा अति-तीक्ष्ण ज्ञानी साधक मिळणे जरा दुर्लभच आहे. म्हणूनच श्रद्धा आणि संशय हे जणु आपले दोन पाय किंवा दोन डोळे असे लक्षात घेतले तर दोन्हींचा उपयोग होऊ शकतो. आपल्याकडे दोन पाय उपलब्ध असताना उगीचच एकाच पायाने लंगडी घालत का वेळ घालवायचा??? उगीचच दोन पायांची आपापसात लढाई कशासाठी??? Lol लक्ष हवे साध्यावर जसे अर्जुनाचे पक्षाच्या डोळ्यावर होते म्हणतात तसे. लक्ष हवे रोग मिटण्यावर... कोणते औषध काम करेल काय फरक पडतो का? J

श्रद्धाळू साधकामधील 'वेगळेपणाचा भास' जसा शेवटी विवेक सधल्यावर (साधल्यावर नव्हे) नाहीसा होतो तसाच संशयी (बुद्धीआधारीत/ ज्ञानमार्गी) साधकासाठी त्याच्यामधील "संशय घेणार्‍यावरच जर संशय' घेतला गेल्यास (Doubt the Doubter@) हाच 'वेगळेपणाचा भास' नक्कीच नाहीसा होऊ शकतो.... 'बोध'' म्हणजे श्रद्धा आणि संशय अश्या दोन बाजू असलेल्या नाण्याचे कायमचे विसर्जन!

"श्रद्धा आणि संशय" ह्या जणू दुधारी तलवारीच्या दोन बाजू. ज्याला खरच सुख-दुखःच्या भोवर्‍यातून मोकळे व्ह्यायचे आहे... ज्याची मरायची खरंच तयारी आहे 
(मरणार कोण तर 'मी' ही कल्पना, म्हणजे जी सत्य नाही तीच मरणार आहे... स्वतःबद्दलचे गैरसमज/कल्पना नष्ट होणार आहेत) आणि तशी तळमळ आहे त्याच्यासाठी कोठल्याही एकाच धारदार बाजूचा आग्रह कशासाठी??? Lol

शून्याचा पाढा कधी कोणी पाठ करतो...? शून्य एके शून्य ... ह्यावर कोणीही श्रद्धा ठेवतो अथवा संशय घेतो??? सूर्य आहे ह्यावर कोणी श्रद्धा ठेवतो किंवा त्याबाबत संशय घेतो???? "मी आहे" ह्या प्रत्येकामध्ये उपस्थित जाणीवेवर कधी कोणी श्रद्धा ठेवतो अथवा संशय घेतो??? "तू जीवंत आहेस का?" हा प्रश्न कोणालाही विचारला गेल्यास तात्काळ "हो" असेच उत्तर येते ना.... का विचार (मन-बुद्धी वापरून) करून सांगतो असे उत्तरे येते??? "जे आहे ते आहेच" ही प्रत्यक्ष स्वानुभुती म्हणजेच आत्मबोध, जो श्रद्धा आणि संशय ह्यांच्या अलिकडला आणि पलिकडला. आपल्या सत्य-नित्य 'असण्याला' अस्तित्वाच्या चौकटीची/देहाआकाराची
किंवा तात्पुरत्या 'असणेपणाच्या भासाची/ जाणीवेची' कद्यपिही आवश्यकता नाही.

‘आत्मबोध’ म्हणजे आस्तिकतेचे आणि नास्तिकतेचेही संपूर्ण विसर्जन आहे.... कारण आस्तिकता किंवा नास्तिकता हे दोन्हीही आग्रह आहेत जे 'वेगळेपणाच्या ग्रहावर (कल्पनेवर)' अवलंबून आहेत. ग्रह मिटला कि कसला आग्रह!? ग्रह मिटला म्हणजेच बंधनाचे ग्रहण सुटले! ग्रह मिटला म्हणजे 'मी' आणि 'देव'* ह्यांमधील काल्पनिक अंतर मिटले. (* अद्वैत स्व:-स्वरुप/ समग्रता/ समष्टी/ अस्तित्व/ प्रेम/ परमसत्य)
स्वरूपावरील लागलेल्या ग्रहणालाच ज्यांनी "ग्रहण" लावले... त्या सदगुरुंना शतषः नमन! त्यांचेच त्यांनाच नमन! जय गुरु

सप्रेम शुभेच्छा...


नितीन राम
०४ नोव्हेंबर २०१३

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

* हा ब्लॉग मन-मोकळ्या चर्चा आणि सुसंवादासाठी खुला आहे. 
* वाचकांपैकी कोणीही उत्स्फुर्तपणे ह्या लेखाचा इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केल्यास त्याचे सहर्ष स्वागत. त्यामुळे हा विषय अनेक अ-मराठी वाचक/साधकांपर्यंत पोचण्यास मदत होइल.
वरील लेखन आस्तिक अथवा नास्तिक ह्या दोघांमधील बाह्य द्वंद्व (Fight) मिटवण्यासाठी नसून कोणत्याही साधकाच्या अंतरंगातील द्वंद्व/द्वैत (Duality) मिटल्यास आनंदच आहे. सप्रेम आभार.

Saturday, November 02, 2013

'रोशनी' को ... उजाला मुबारक!

दिवाली का उजाला,
बस एक बहाना है!

तुम 'खुद' रोशनी ही हो,
बस 'पहचान' लेना है! :-)

रोशनीको... उजाला मुबारक !

जय गुरु _()_

नितीन राम

०१ नवंबर २०१३

www.abideinself.blogspot.in
Whatever the Question, Love is the Answer!