Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, May 26, 2011

श्रद्धा हरवली आहे का हो...!

श्रद्धा हरवली आहे का हो...!




















श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!
जेमे-तेम दोन-तीन वर्षांची भोळी श्रद्धा! कायम तर घरीच असायची!
आहे-नाहीच्या भानात पण नसायची! अचानक कोठे गेली ही श्रद्धा!!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

कदाचित कल्पनेच्या पंखावर बसून भरकटली असावी;
शब्दांच्या बाजारात न कळतच अडकलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

नकळत संशयाची उसनी चप्पल घालून गेली असावी;
मुक्तीच्या शोधात कोठेतरी अडखळलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

कोणी म्हणते स्वतःचे घर शोधायला गेली असावी;
कोणी म्हणते कुलुपाची किल्ली शोधायला गेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

काही म्हणतात शांतीला शोधायला गेली असावी;
काही म्हणतात आनंदाला शोधायला गेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

कोणी सांगतात ज्ञानार्जन करायला गेली असावी;
कोणी म्हणतात योगाभ्यासात गुरफटली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

कोणी म्हणते तिला विचारांची विषबाधा झालेली असावी;
कोणी म्हणते भ्रमाच्या भोवर्यात अडकलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

कोणी म्हणतात एकटेपणाला वैतागलेली असावी;
कोणी म्हणतात स्वतःपासून दूर पळाली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

आता जवळपास पन्नास साठ सत्तर वर्षे झाली कि हो....
काय माहीत निरागस श्रद्धा कोठे कोठे फिरते आहे अजून!!
काय माहित का स्वतःपासून लांब लांब पळते आहे अजून!!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!!

कदाचित एव्हाना आपला निरागसपणा हरवून बसलेली असावी;
कोणी सांगावे कदाचित बुद्धीच्या अलंकारांनीही मढलेली असावी!
श्रद्धा हरवली आहे हो...! आत्ता तर इथेच होती...!!! :-)

ऐका...अहो...ऐका!!! ही पहा श्रद्धा इथेच तर आहे की...!!
अहो श्रद्धेला आत्ताच “जाग” आली! श्रद्धा जागच्या जागीच "जागी" झाली हो..!!
श्रद्धा… स्वगृहातच जागी झाली...!! श्रद्धेला पडले होते स्वप्न; अहो जागेपणातले स्वप्न..!! श्रद्धा कोठे गेलीच नाही आणि आलीही नाही!! स्वप्नातलेच ते हरवणे आणि स्वप्नातलाच तो "शोध"...!! आता मात्र श्रद्धा श्रद्धेलाच भेटली....खरीखुरी..!! श्रद्धा स्वतःलाच भेटली...कायमचीच! ............आपलीच भेट आपणासी...!!! आता कोठ्ले जाणे आणि येणे...!!!

सप्रेम.......

जय गुरु

-नितीन राम
२६ मे २०११

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer!

KIND REQUEST:

Any visitor,  who would like to translate this Marathi post in English are most welcome.

10 comments:

दिलीप said...

विचारांच्या गूढ गर्भात ढकलून तेथून भावाच्या, प्रेमाच्या अथांग समुद्रापर्यंत आपण आणून ठेवलेत. शब्दातून आपले आभार कसे मानावेत? श्रद्धेची पराकाष्ठा, अनंत अशा श्रद्धेची सुरुवात आणि अंत दोन्ही श्रद्धेतच आहे हे फारच समर्पकतेने दाखवून दिलेत. नमस्कार.

दिलीप

Satya Murti Sunil said...

"lovely.."

Jai-Mohan said...

Dear Nitin,

Sunder Sunder Atee Sunder
Sunderahoon Sunder Sun.......der. Bus,jeebha thakali.
Love.

Jai-Mohan

JD said...

AwarNaniYa....Awesome.....Absolutlybeautiful.Thnaks NR.

नंदा काका said...

नितिनजी,
तुझी पत्रे (सर्व काही वेदांत ) वाचनीय असतात आणि मी त्याची पोच सुद्धा देत नाही ह्याचे वाईट वाटते. आपण वेदान्त पचवला आहे. आह्मी रोज ध्यान करतो परन्तु तुमच्या सारखे लिखाण प्रयत्न करून अवघड वाटते. आपण निसर्ग्दात्तासारखे मोठे व्हावे ही मनोमन इच्छा !
सर्वाना यथायोग्य
नंदा काका

जाह्नवी देशपांडे said...

खूप सुंदर

जाह्नवी देशपांडे
19/06/2011 - 10:53

Deepa said...

Loss and gain, of things in vain, of wisdom's flight, and meanings trite..Superb, as always!

Manoj Sardesai said...

Mala ek goshta kalat nahiye ,,,shradha vyakti var thevavi ki vicharanvar?????

Nitin Ram said...

श्रद्धा...फक्त श्रद्धा....! 'कशावर' श्रद्धा हे गौण आहे. ज्यावर श्रद्धा बसते ते एक 'वर-करणी बाह्य कारण' आहे फक्त. म्हणुनच तर ज्यांची दगडांवर पण श्रद्धा बसली त्यांनाही देव (स्वः-स्वरूप) भेटला आणि ज्यांची 'आकार-रुपी' व्यक्तींवर बसली त्यांनाही भेटला आणि ज्यांची गुरु-वचनावर (विचार) बसली त्यांनाही भेटला. 'कोणावर' श्रद्धा बसते हे गौण आहे मग ती व्यक्ती असो अथवा विचार. 'प्रकट होणे' ( टू मॅनिफेस्ट) हा श्रद्धेचा मूळ स्वभावच आहे. निराकारावर श्रद्धा बसणे जरा अवघड आहे कारण श्रद्धा ठेवणारा स्वतःला 'आकार' मानतो आहे ना. स्वतःला आकार मानणार्‍याला दुसर्‍या आकारावर (व्यक्ती/गुरु/देव) श्रद्धा बसणे स्वाभाविक पणे सोप्पे जाते. दुसरा कोणताही आकार्/रूप हे फक्त माध्यम आहे...कशासाठी तर आकाराच्या पलिकडे असलेल्या 'निराकाराला' पाहण्याचे...निराकाराला जाणण्याचे...ओळखण्याचे. दुसरी गोष्ट म्हणजे...ज्यांचा जन्मजात, स्वभावगत कल/रुची श्रद्धेमध्ये आहे त्यांच्यासाठी श्रद्धा हरवली आहे का हो...! हे पोस्ट आहे. सर्वांसाठी हे कदाचित लागू होणार पण नाही. धन्यवाद मनोज आणि दिपा :-)! श्रद्धा ठरवून ठेवली जात नाही....ती आपसूक बसते. जेथे प्रेम आहे तेथे श्रद्धा आहेच. श्रद्धा म्हणजे प्रेमाच्या वृक्षावर उमललेल्या फुलाचा 'अनिवार्य' सुगंध...... :-)
श्रद्धेच्या मार्गामध्ये एकच धोंडा.....एकच अडचण...एकच अडथळा..... 'संशयरुपी बुद्धी'.
जेथे भाव तेथे देव...जय गुरु _()_

Anonymous said...

Apali swatawar asnari shraddha his khari shrddha.