एक प्रवासः संपूर्ण... अपूर्ण....संपूर्ण.
सुरुवात संपूर्ण आणि अंतही संपूर्ण.
अंत नव्हे ती तर परिपूर्णता..!
ह्या दोन्हींच्या दरम्यानचा प्रवास म्हणजे...
पूर्णानेच पूर्णाला...
अपूर्णाच्या वेषात मारलेली एक प्रदक्षिणा..!
संपूर्णातून अपूर्ण कसे काय बरे निघणार...!
तसे कधीही निघालेले नाही आणि
निघूही शकत नाही...
कारण तो त्याचा स्वभावच नाही!
त्यातून निघतो तो फक्त... "अपूर्णतेचा भास"!
अ'पूर्ण'तेच्या पोटात जितका
‘पूर्ण’ भरलेला आहे तितकाच
सं'पूर्ण'तेच्या पोटातही आहे ना...!
अपूर्णतेच्या भासाची गाठ एकदाची सुटली...
कि पूर्णाला पूर्णाची गाठ पडली....
पूर्णाला पूर्णाची ओळख पटली.
जेथे खरी ओळख पटली
तेथे खोटी ओळख संपली...!
सप्रेम नमस्कार
जय गुरु
-नितीन राम
२२ नोव्हेंबर २०११
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.