Search AbideInSelf

Total Pageviews

Saturday, June 30, 2012

जे सदैव... तेच आत्मस्वरूप


कस्तुरीच्या शोधात सैरावैरा फिरणारेकस्तुरीमृग

जे 'सदैव' त्याला 'आहे-नाही' चा भास नाही... 'असणे-नसणे'' हा भास. जे 'सदैव' ते 'आहे-नाही' च्या भासावर अवलंबून नाही. जे 'सदैव' ते 'आहे-नाही'च्या भासाच्या पलिकडचे. जे सदैव ते 'असणे-नसण्याच्या' पलिकडचे. जे सदैव त्याला अस्तित्वाची चौकट असत नाही. जे सदैव त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज असत नाही. जे सदैव त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज उरत नाही. जे सदैव तेच आत्मस्वरूप.

जे सदैव तेच अनंत. जे सदैव तेच निरंतर, जेथे अंतर उरत नाही. सदैव तेच जे सर्व 'जर-तर' च्या पलिकडचे. सदैव तेच जे सर्व प्रश्न-उत्तरांच्या पलिकडचे. सदैव तेच जे आत्ता आणि इथे आहे...आणि आहेच. सदैव तेच जे कोठुन येत नाही आणि कोठेही जात नाही.

जो येतो आणि जातो...तो 'आहे-नाही' चा भास. 'जाग-झोप' हा भास.....'जन्म-मृत्यू' चा भास. 'वेगळेपणाचा' भास आहे म्हणून तर सर्व त्रास आहे. 'वेगळेपणाचा' भास हाच मूळ आभास आहे. 'वेगळेपणाचा' भास मिटला कि मग कोठला त्रास...???

वेगळेपण मिटणार नाही पण मिटेल तो फक्त 'वेगळेपणाचा' भास. हे कसे काय ? ज्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताकडे 'आपण डावा आहोत' किंवा 'आपण उजवा नाही आहोत' किंवा आपण शरीरापासून वेगळे आहोत हा भास नाही आणि तरिही डाव्याबाजूला असलेली वस्तु उचलायची वेळ आली की हा डावा हात आपसूक पुढे येतो आणि वस्तु सहज आणि आपसुक उचलली जाते ना? अगदी तसेच आहे हे.

त्याचप्रमाणे जन्म ते मृत्यू ह्या कालखंडात आपल्या देहाचे वेगळेपण मिटणार नाही पण आपण ‘फक्त देह’ आहोत ही भासमय धारणा मिटणार... ! का बरे ही भासमय धारणा आहे? गाढ झोपेमध्ये कोठे असते ही धारणा...कोठे असतो हा 'वेगळेपणाचा भास' ? असतो का ??? जागेपणीच्या सोळा तास जो 'भास' कायम उपस्थित असतो तो झोपेमध्ये आठ तास कोठे जातो बरे?? वर्षोंवर्षे हाच उपक्रम सतत चालू आहे ना... का नाही? फक्त त्याकडे आपले लक्ष जात नाही इतकेच....!

झोपेमध्ये आहे का कसली चिंता... कसला त्रास... सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा ? झोपेमध्ये आहे का कसली चिंता... कसला त्रास... सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा ? ज्याप्रमाणे झोपेमध्ये सुख-दुखःरहित पूर्णता असते तशीच जागृती अवस्थेमधेही संपूर्णता उघड होउ शकते. हेच ते ‘सदैव स्वरूप’, ज्याला 'आहे-नाही' चा भास नाही. ते 'आहे-नाही' च्या भासावर अवलंबून नाही. त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज उरत नाही.

तुझे आहे तुजपाशी... परी तू जागा चुकलासी!

जय गुरु

सप्रेम नमस्कार.

नितीन राम
०९ जून २०१२

http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Related posts:

तूच रे... तूच रे
http://abideinself.blogspot.in/2012/06/blog-post_26.html
'मी' कोण आहे? - एक सोप्पे कोडे!
http://abideinself.blogspot.in/2012/05/blog-post.html
'मी' कोण आहे? : मूळभूत प्रश्न
http://abideinself.blogspot.in/2012/03/blog-post.html
तो ‘तू’ नव्हे !
http://abideinself.blogspot.in/2011/09/blog-post_17.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे
http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
ह्या क्षणात 'स्थित' होणे शक्य आहे का...!!!
http://abideinself.blogspot.in/2011/07/blog-post.html
सत्य एकच आहे
http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post_04.html
सदगुरु म्हणजे सर्वस्व
http://abideinself.blogspot.in/2010/07/blog-post_12.html

No comments: