Search AbideInSelf

Total Pageviews

Tuesday, March 15, 2011

Where is the difference!

Where is the difference!

The only thing that separates
Guru from disciple is the word & the belief in the word… ‘Separation’! :-)

The only thing that differentiates
Guru from disciple is the word & the belief in the word… ‘Difference’! :-)

Jai-Guru _()_

With Love,

-Nitin Ram
14 March 2011
www.abideinself.blogspot.com

kind request: Better not dissect the words saying Guru & Satguru are different! Whatever the difference one can see is 'within' which gets projected outside! Thanks & Regards!

Wednesday, March 09, 2011

गुरु आणि शिष्य ही नावे झाली. ती रुपे नव्हेत.


"गुरु आणि शिष्य ही नावे झाली. ती रुपे नव्हेत." - श्री निसर्गदत्त महाराज

आपल्यासाठी आपण काय आहोत ह्या मान्यतेवरच आपण इतर कोणालाही ओळखू शकतो. जणू आपल्याला असलेली आपली ओळख हा आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीला/वस्तूला ओळखण्यासाठी एक प्रकारचा चश्मा म्हणून काम करतो. ज्याने स्वतःला ओळखले तो दुसर्‍या कोणालाही ओळख विचारायला जात नाही, ओळखायला जात नाही, त्याची गरजच मुळी उरत नाही. जोपर्यंत शिष्य स्वतःला देह-रुप समजतो तोपर्यंत स्वाभाविकपणे त्याला गुरुदेखील देहधारी व्यक्ती असेच दिसतो. जोपर्यंत शिष्याच्या ठायी 'वेगळेपणाचा भास आहे, विश्वास आहे तोपर्यंतच गुरु वेगळा म्हणून उपस्थित आहे. ज्या क्षणी शिष्यामधील वेगळेपणाचा भास गळून पडतो तत्क्षणात गुरु आणि शिष्य हि फक्त नावे होती, फक्त संज्ञा होत्या हे स्पष्ट उलगडले जाते. शिष्याचा वेगळेपणाचा भास गळून पडण्याचाच अवकाश असतो कारण गुरुसाठी स्वतःचे वेगळेपण केव्हाच लयाला गेलेले असते. जोपर्यंत दुसर्‍याची गणती आहे फक्त तोपर्यंतच एकाला स्थान आहे. दुसरा गळून पडताच उरलेल्याने कशाची गणती करावी आणि का बरं गणती करावी? म्हणूनच तर ह्या उरलेल्या भरपूर अनुपस्थितीला 'एक' न म्हणता, अद्वैत (दोन नाही असां) म्हटले गेले आहे. गुरु-शिष्याच्या ह्या पूर्वपक्षातील खेळाला "मॅड" गेम (मास्टर ऍन्ड डिसाइपल) असे पण म्हणता येईल. 'शिष्य' जोपर्यंत शिष्य भूमिकेमध्ये असतो तोपर्यंतच गुरु, गुरुची भूमिका खेळतो. बांस इतकेच. :-)

जय गुरु _()_

-नितीन राम

Friday, March 04, 2011

The Eternal Nature: Our True Nature!

The quote I heard:

We need everything “Permanent”
For a “Temporary” life..! lol

 
As I See … I Say: :-)

Our Real Nature is Permanent,
Everything else is Temporary!

How can the Eternity seek anything
Other than its Real Nature!

Actually the Eternity does not seek Anything.
The eternity, hypnotized as a separate
'body-mind premise' seeks everything!

It is the inherent nature of the Eternity
To prevail in abundance… eternally,
despite of your belief system! :-)

With Love,

-Nitin Ram

03 March 2011
www.abideinself.blogspot.com
 
 

Tuesday, March 01, 2011

शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन

Intellectual Understanding, the Golden hand cuffs:

एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध, अभ्यासातून झालेला बोध, शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेल मधील मेनूकार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थांची पाकक्रीया पाठ होण्यासारखे आहे. ह्यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते पण "भूक" मात्र नक्कीच भागत नाही. विविध शात्रांचा, ग्रंथांचा अभ्यास जास्तीच जास्त काय देउ शकतो तर.. पांडित्याची एखाधी मोट्ठी पदवी किंवा एखादा ज्ञानपीठ सारखा पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा. पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही... त्याने आपल्याला आपल्या 'कायम' स्वरुपाचा बोध मात्र नाही मिळत. जे बुद्धीच्या अलिकडचे आहे ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय कळणार !! "भूक" कायमची न-भागल्यामुळे, मग पांडित्याच्या आधारावर चालू राहते अजून अजून पाठांतर, अजून अभ्यास, अजून शब्दांची जमवा-जमव, विविध वैशिष्ठ्यपूर्ण मेनूकार्डचे वाचन आणि पाठांतर...आणि स्वाभाविकपणे त्याबरोबर सोबत फुकट मिळतात नव-नवीन दु:ख, नव-नवीन बंधनरूपी आभूषणे. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... वास्तविक "ज्ञान आणि अज्ञानाच्या अलिकडे व पलिकडे" असलेल्या आपल्या खर्‍या कायम स्वरुपापर्यंत कधीच पोचू शकत नाही. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... फक्त मूळ सदवस्तूकडे... स्वरूपाकडे निर्देष करण्यापर्यंतच कामाचे आहे हे "जाणले" तरी स्वरूपबोध "उघड होण्यास" यत्किंचीतही वेळ लागू शकत नाही.

दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध... स्वरुप-बोध... जो आहे अनायास.. आपसूक... निरावलंब... निराधार. येथे आहे सहज विश्रांती ! :-)

सप्रेम नमस्कार


-नितीन राम

Few suggestive posts:

सत्य’ एकच आहे: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post_04.html
"बोध" म्हणजे काय...!: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
विश्रामः http://abideinself.blogspot.com/2010/10/blog-post_21.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे: http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html
बोध म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html

Thursday, February 10, 2011

What is Spirituality?

What is Spirituality?

They say science is an outward search and spirituality - inwards. We have heard enough of the differences between science and spirituality so far. It is also said that science and spirituality are diametrically opposite poles. Science is based on some inherent assumption which results in some hypothesis and this “so called” Spirituality is also based on some beliefs or ideologies.

But is there any similarity between Science and Spirituality..?? Oh ...yes!! Science as well as Spirituality both are based on one single foundation of assumption and that is nothing but “Acceptance of Duality”!

Both believe in the presence of a separate ‘Searcher’ and there starts the concept of Search….concept of Union…concept of Yoga!!! :-)

Spirituality is in a way a relative term or a concept and hence the definition of the same will vary person to person. For someone spirituality is reducing sufferings or self improvement or escape from boredom or curiosity of the unknown or to get enlightened (?) etc. There are various sub-concepts found associated with the concept called spirituality like Building schools, carrying out social work, building ashrams and centres, helping others (?) or to be associated with any particular spiritual sect or a group or registering a Spiritual Guinness book record and many more. But all these purposes and sub-concepts are entirely based on the foundation of assumption as mentioned earlier.

In a broader perspective the spiritual seeker may get involved either in seeking or finding answers based on the foundation of his/her assumption that he/she is a separate entity or else the seeker can try & find out by challenging this foundation of assumption.

The first option of seeking on the foundation of assumption is usually & naturally opted as a path and the seeker realizes (or may not realize) the futility of the same after many years as the seeking never ends with any of the methods professed or practised as all of them keep the seeker still enmeshed in the duality and in the games of the duality. I have seen hundreds of so called seekers, seeking for more than forty years and yet suffering and waiting for the enlightenment. What is enlightenment? Well that is a separate subject and can be dealt separately. ;-)

Hence the real question can be asked within is, "Who" is seeking the spirituality?". Or may be, "Who is seeking?" What is the nature of that identity which is seeking? With the pondering on this question, the seeking definitely ends. As the sole & whole purpose of seeking is nothing other than ending the seeking!! With the ending of the seeking the spirituality gets revealed as a mere illusion. Spirituality and the Samsara are not and were never separate. But as the seeker believes in the realness of the Samsara, hence his belief on the realness of the spirituality strengthens which further leads to belief in the concepts like nirvana or the enlightenment which subsequently leads to more concepts and more bondages instead of the freedom for which the journey had started. :-)

You are welcome to ponder over, enquire, investigate, absorb or else get ABSORBED..!

With Love,

-Nitin Ram
25 Nov 2010
www.abideinself.blogspot.com
Being is 'ease' and becoming...a Dis'ease'

Wednesday, February 09, 2011

दु:खके सब साथी... सुखमे न कोई :-)

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
इथे फारशी कोणाला त्याची गरज असत नाहि.
तहान लागलेली नसताना मिळालेले पाणी कोणाच्या बरे कामाचे!

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
दु:खाची सवय असलेल्यांना, दु:खच जास्ती ओळखीचे असते.
द:खात रमलेल्यांना 'सुख', उलट जास्ती दु;खी करते.
आणि मग त्यांचे दु:ख तुम्ही पाहू शकणार नाही.

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
ज्याला पाहिजे आहे तो आपोआप येतो आणि घेउन जातो.
घेणारा आणि देणारा सुखरुप होतात....
घेणारा भरून जातो तर देणारा हलका :-).

सर्व साथी दु:खातलेच, साथ म्हणजे दोन... द्वैत!
द्वैतातले सुख काय आणि दु:ख काय...
एकाच नाण्याच्या दोन बाजू!
पण “वास्तविक सुख” (आनंद) ते आहे ज्यात द्वैत नाही...
दु:खतर नाहिच पण सुख पण नाही. येथे दोन्हीला थारा नाही...
येथे 'दोन'ला बिलकुल थारा नाही.
येथे दु:खाची चिंता नाही आणि सुखाची अपेक्षा पण नाही.
येथे सुखाची अपेक्षा असलेला असा कोणीच वेगळा नाही,
मग येथे 'सुख' जाणवणार तरी कोणाला!
येथे आहे अद्वैतानुभुती, द्वैतामध्येच राहून... अद्वैतानुभुती.
येथे आहे समाधान... अनायास समाधान.
येथे आहे … अकारण आनंद. येथे आहे शब्दातीत असे.... सर्वस्व :-) !

दु:खके सब साथी... सुखमे न कोई  :-)

हिरा मिळाला तर जपून ठेवा...जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
ज्याला पाहिजे आहे तो आपोआप येतो आणि घेउन जातो.
घेणारा आणि देणारा सुखरुप होतात....
घेणारा भरून जातो तर देणारा हलका :-).

सप्रेम _()_

-नितीन राम

१६ नोव्हेंबर २०१०

साथी: http://abideinself.blogspot.com/2008/04/blog-post_16.html

Friday, February 04, 2011

'सत्य' एकच आहे

‘सत्य’ एकच आहे... अभिव्यक्ती अनेक आहेत. सत्याचेच दुसरे नाव म्हणजे 'एक' किंवा त्या एकाचेच दुसरे नाव म्हणजे 'सत्य'. नांव काहिही द्या.... सत्य... स्वरुप... सर्वस्व... सदगुरु, जे कायम आहेच ते कधीही बदलु शकत नाही. ‘सत्य’ अभिन्न आहे पण त्याच्या अभिव्यक्ती फक्त भिन्न आहेत. ‘सत्य’ कायम आहे… आत्ता आहे… इथे आहे.

माझ्या दृष्टीने खरा सत्यशोधक किंवा साधक तो ज्याची 'नजर', ज्याचे 'लक्ष' सत्यावर आहे आणि ज्याची 'नजर' सत्यावर आहे त्याला कोठल्याही अभिव्यक्तीमधे "ते" सहज सापडू शकते. पण सर्व लक्ष फक्त अभिव्यक्तीवरच असेल तर, ते सुद्धा एका प्रकारचे बंधनच आहे. कोणीतरी कृष्णाची गीता वर्षोंवर्षे वाचतो आहे, कोणी तरी योग-वसिष्ठाची हजारो अनुष्ठाने करतो आहे तर कोणी ज्ञानेश्वरीची आजन्म पारयणे करतो आहे. इतके सारे करुनही जर आपण असलेल्या "ज्ञान-ईश्वराची" सत्य-नित्य... सहज ओळख जर झालेली नसेल तर त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणांचा काय उपयोग आहे हो....!!!!

ह्यालाच मी अभिव्यक्तींचे बंधन म्हणतो आहे. अनेक अभिव्यक्ती आहेत आणि नक्कीच त्या सुंदरही आहेत पण जर त्या, साधकाला 'मोकळा' करण्यासाठी त्या त्यावेळापुरत्या असमर्थ असतील तर त्याच-त्याच अभिव्यक्तींमध्ये घुटमळण्यात, अडकण्यात फारसा काही अर्थ नाही. जर कोठलीही अभिव्यक्ती, मोकळे करण्याच्या ऐवजी जर उलट अजून बांधत असेल तर ते ही एक प्रकारचे बंधनच नव्हे का ?

'सत्य' एखाद्या विशिष्ट अभिव्यक्ती मध्येच आहे हा देखील एक प्रकारचा भ्रमच आहे ना :-) ! सत्य कायमच नित्य-नूतन रुपातून अभिव्यक्त होतच राहते आणि कायम राहणारच. पण साधकाची श्रद्धा मात्र भूतकाळावर इतकी अडकलेली आहे कि त्याला वर्तमान काळावर लक्षच जात नाही. जणु काही ‘सत्य’ फक्त भूतकाळातच जीवंत होते आणि वर्तमान काळात मात्र ‘सत्य’ मेले आहे :-). साधकाची वर्तमान काळावर जशी श्रद्धा दृढ होते तशी त्याची नजर...दृष्टी वर्तमान क्षणावर स्थिर होते आणि मग वर्तमानातील अभिव्यक्तींमधे त्याला सत्याची चाहूल लागू लागते, सत्याचा सुगंध सापडू लागतो... सत्याचे दर्शन होऊ लागते. होता होता होता... जे जवळाहूनही जवळ होते आणि आहेच त्या आपल्याच सत्य-स्वरुपावर त्याचे लक्ष जाते आणि ते आपलेच सत्य-नित्य स्वरुप आपोआप आणि कायमचे..... "उघड" होते.

सप्रेम नमस्कार

जय गुरु _()_

नितीन राम
२५ जानेवारी २०११

http://www.abideinself.blogspot.com/

Few suggestive posts:
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे: http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
विश्रामः http://abideinself.blogspot.com/2010/10/blog-post_21.html
"बोध" म्हणजे काय...!: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
"बोध" म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html


Wednesday, February 02, 2011

"बोध" म्हणजे काय...!

आत्मबोध


बोध म्हणजे नक्की काय ? बोध म्हणजे अभ्यास का ?

बिलकूल नाही. अभ्यास म्हणजे फार फार तर बोधाचं खोटे नाणे!
अभ्यास म्हणजे वर वर वाटतो, बोधा जवळ जायचा प्रवास
पण वास्तविक दृष्ट्या मात्र ठरतो बोधापासून लांब पळायचा प्रयास.

'अभ्यास' म्हणजे... बोधाचा फक्त आभास, तर
'बोध' म्हणजे... सतत, सहज, अनायास असा ... "आत्मबोध" !

'बोध' म्हणजे... शोधाचा कायमचा अंत आणि शोध घेणार्‍याचाही अंत.
'बोध' म्हणजे... शोध आणि शोधणारा ह्या द्वयीचा अंत.
'बोध' म्हणजे... दु:खाचा अंत आणि सुखाचाही अंत.
'बोध' म्हणजे... कोठल्याही पाठाचा अंत आणि पाठ करणार्‍याचाही अंत.
'बोध' म्हणजे... आरंभाचा अंत आणि अंताचाही अंत.
'बोध' म्हणजे... जन्म आणि मृत्यू ह्या संकल्पनेंचा कायमचा अंत.
'बोध' म्हणजे... अभ्यासाचा अंत आणि अभासकाचाही अंत.
'बोध' म्हणजे... द्वैताचा अंत नव्हे तर... द्वैत धारणेवरील श्रद्धेचा अंत.
'बोध' म्हणजे... जे काही... 'कळले' असे वाटते आहे त्याचा अंत.
'बोध' म्हणजे... ग्रंथ, वचने... पुस्तके, शब्द असल्या कोठल्याही आधारांचा अंत.
'बोध' म्हणजे... आपल्याच अनंत आणि निराधार स्वरुपाचा बोध... आत्मबोध!
'बोध' म्हणजे... कोठल्याही पाढ्याशिवायचा.... शून्याच्या पाढ्यासारखा बोध :-)

जय गुरु

-नितीन राम
२७ डिसेंबर २०१०

http://abideinself.blogspot.com/2009/11/blog-post_23.html
जेथे ओळख पटली... तेथे ओळख मिटली.



*Also read:
बोध: http://abideinself.blogspot.in/2009/11/blog-post_19.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html
बोध म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html

Monday, January 24, 2011

Your Account is hacked! ;-)

Your account is hacked,
by the hypothetical intruder… ‘me’!

Your account is hacked,
by the illusion of ‘personality’!

Your account is hacked,
by the invisible notion of ‘separation’!

Your account is hacked,
by the cherished concept called progress!

Your account is hacked,
by the faith on the idea of ‘causality’!

Your account is hacked,
by the belief of ‘being in bondage’!

Your account is hacked,
by the fantasy of ‘enlightenment’!

It’s the grace of the Satguru… the Real Nature,
that un-hack and restores the Natural State.

With Love,

-Nitin Ram
23 January 2011

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer

Friday, January 21, 2011

घंटा

जेव्हा निसर्गदत्त समोर असतात तेव्हा रमण महर्षींची घंटा वाजत असते,
जेव्हा रमण महर्षी असतात तेव्हा रामकृष्ण परमहंसांची घंटा वाजत असते,
जेव्हा रामकृष्ण असतात तेव्हा शंकराचार्यांची घंटा वाजत असते,
जेव्हा शंकराचार्य असतात तेव्हा बुद्धांची घंटा वाजत असते,
जेव्हा बुद्ध उपस्थित असतात तेव्हा श्रीकृष्णाची घंटा वाजत असते,
जेव्हा कृष्ण समोर असतात तेव्हा श्रीरामाची घंटा वाजत असते.
जेव्हा श्रीराम उपस्थित असतात तेव्हा परशुरामाची घंटा वाजत असते....... :-)

पण नाद ... हा "अंतरनाद" मात्र कायमच आत्ता आणि येथे आहे!

मग का बरे कायमच मागचा, भूतकाळातील नाद ऐकू येतो! कारण साधकाची श्रद्धा, त्याचा विश्वास कायम भूतकाळावर आहे, त्याची आशा आहे भविष्यकाळावर आणि त्याचा संशय मात्र आहे वर्तमान काळावर..... त्यामुळे 'ह्या' संपूर्ण... परिपूर्ण क्षणाकडे त्याचे बिलकूल लक्षच जात नाही. जे कायम उपस्थित त्यावर संशय आणि जे अस्थिर त्यावर श्रद्धा... ! मी "वेगळा" ह्यावर अढळ श्रद्धा..... होण्यावर श्रद्धा... पोचण्यावर श्रद्धा.... भूतावर श्रद्धा.... उद्यावर श्रद्धा... आणि 'सध्या' वर, 'आज' वर मात्र संशय! बाह्यरुपांवर श्रद्धा... आणि 'स्व-रूपा'वर मात्र संशय ! :-)

ज्याला, ज्या क्षणी 'अंतरनाद' गवसला.... आत्ताचा वर्तमान सूर गवसला..... तत्क्षणात... अरूप असे आपलेच कायम स्व-रूप प्रत्येक रुपामध्ये सहज प्रकट होते.

सर्वस्व... आत्ता आणि इथे आहे.

सप्रेम _()_

-नितीन राम
०६ सप्टेंबर २०१०

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer

*********************************



Baharon Ko Chaman Yaad Aa gaya Hai 19/01/1990

Baharon Ko Chaman Yaad Aa gaya Hai
Bahaaron Ko Chaman Yaad Aa Gaya Hai
Mujhe Wo Gulabadan Yaad Aa Gaya Hai

Lachakati Shaak Ne Jab Sar Uthaaya
Kisi Ka Baankapan Yaad Aa Gaya Hai

Teri Suurat Ko Jab Dekha Hai Mainne
Uruuch-e-fiqr-o-fan Yaad Aa Gaya Hai

Mile Wo Ajanabi Ban Kar To ' Rafat'
Zamaane Ka Chalan Yaad Aa Gaya Hai

With Gratefulness... _()_

-Nitin Ram

Baharon Ko Chaman Yaad

RadioReloaded.com
Download thousands of MP3s

Tuesday, January 18, 2011

तू खरं तर... आनंदघन

तू खरं तर... आनंदघन


दु:ख सकारण, सुखही सकारण. भय सकारण, चिंताही सकारण.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

सुख-दुखा:ची स्टेशनं शोधताना मग भय आणि चिंतारुपी मित्र सापडले.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

कारण इतकेच कि, तुझा तुला न लागलेला शोध, तुझा तुला न झालेला बोध.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

आनंद तुझे रूप, आनंद तुझा रंग,
आनंद तुझा आकार, आनंद तुझा स्वभाव.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

सप्रेम _()_

-नितीन राम

www.abideinself.blogspot.com
१३ डिसेंबर २०१०

Friday, January 14, 2011

Silence is the language of Love, Rest all is just a translation!

Silence is the language of Love, Rest all is just a translation!

Watch intoxicating Nusrat fateh Ali Sahaab:
Video Part 1: http://www.youtube.com/watch?v=GWKR5CsRZ8Y
Video Part 2: http://www.youtube.com/watch?v=nXPh5-_sIi0
Video Part 3: http://www.youtube.com/watch?v=Nsq_jEEOzuY

Chhap tilak sab cheeni ray mosay naina milaikay
Chhap tilak sab cheeni ray mosay naina milaikay
Prem bhatee ka madhva pilaikay
Matvali kar leeni ray mosay naina milaikay
Gori gori bayyan, hari hari churiyan
Bayyan pakar dhar leeni ray mosay naina milaikay
Bal bal jaaon mein toray rang rajwa
Apni see kar leeni ray mosay naina milaikay
Khusrau Nijaam kay bal bal jayyiye
Mohay Suhaagan keeni ray mosay naina milaikay
Chhap tilak sab cheeni ray mosay naina milaikay
-Amir Khusro: The Sufi Saint (1253-1325)

Translation:

You've taken away my notions, concepts, identity, by just a glance.
By making me drink the wine of love-potion,
You've intoxicated me by just a glance;
My fair, delicate wrists with green bangles in them,
Have been held tightly by you with just a glance.
I give my life to you, Oh my cloth-dyer,
You've dyed me in yourself, by just a glance.
I give my whole life to you Oh, Nijam (The Beloved Master),
You've made me your bride, by just a glance.

With Love _()_

-Nitin Ram

14 JANUARY 2011
http://www.abideinself.blogspot.com/

Monday, January 03, 2011

Whatever the question, Love is the only Answer!

A man went to the doctor and said, "Doctor every night in my dream I play soccer." Doctor said, "Take these pills, they will help you sleep better."
The man said, "I can't take them. Tonight is the final game."

I happen read this joke today and found it to be rather a naked reality than a joke :-).

After all who wants to end the dream!!! Hardly one in a million. The seeker 'appear' to be in the process of ending the dream, but actually fears for the same. The seeker likes to be known as a spiritual seeker ...
loves to continue playing the game as reality rather than discovering the waking dream as the Dream. The seeker go on seeking, searching and finding the medicines for the Dis"ease' and upon getting them, instantly backtracks and misses the golden opportunity of discovering the Eternal Ease.

The backtracking happens with a fear of dissolution of the accepted notions, beliefs, concepts and inability to cognise the Inexpressible Truth as his Real Nature. The backtracking happens mainly because of the absence of love...the absence of intrinsic faith in the most powerful Alchemy called LOVE.

Whatever the question, Love is the only Answer! :-)


Wish you a Lovely New Year 2011!
With Love,
-Nitin Ram

http://www.abideinself.blogspot.com/
03 JANUARY 2011

Thursday, December 09, 2010

Tring Tring… Tring Tring: ‘You are not reachable’

Tring tring ….. ‘You are not reachable’!
Neither I can access you nor can you access yourself,
while you are on an active mode.

Tring tring ….. ‘You are not reachable’!
Neither I can access you nor can you access yourself,
while you are on a meeting mode.

Tring tring ….. ‘You are not reachable’!
Neither I can access you nor can you access yourself,
while you are on a reading mode.

Tring tring ….. ‘You are not reachable’!
Neither I can access you nor can you access yourself,
while you are on a searching mode.

Tring tring … Tring tring ... ‘Hello’'!
This is the ‘just be’ mode;
You are already at HOME. :-)

Best wishes with love,


Nitin Ram
08 Dec 2010

http://www.abideinself.blogspot.com/

Being is ease and Becoming ... a Disease

Saturday, November 27, 2010

NISHABDA - The Wordless

Neither garlands
nor bouquets of words
can describe THAT
which is prior to words.

Words form questions
and replies are of words
all is a play for that
Silent Word.

Wordy kite
with wordy thread
reaches the sky
but can’t be read.

Wordy boat
floats on wordy bank
to fathom the depth
it remains blank.

Word means the language
Language of breath;
But selfless is He
The knower of breath.

Beds of words
with pillows of words
if you can’t get rest
then leave them for best.

Adding word to word
and making a rhyme
Gathering meaningless words
Is a waste of time.

Here is a wordy play
in the wordy market
Know the Knower
prior to losing your wicket.

Bondage of words
And love for words
can these concepts
Take you forward?

Jumble of words
and wordy ways
Take you nowhere
but make you sway.

Colours of words
and wordy company
to know the Silence
it is useless symphony.

Play of words
give only trouble,
Know the Knower
because life is a bubble.

Wisdom of words
in a wordy market
you yourself are the support
Please don't forget.

Words have become important
and not the feelings
How will you know
your true dwelling!

Words make ‘me’
and words make ‘you'
By Sat-Guru's grace you will know,
you are the knower of the wordless principle.

-Nitin Ram

Original Marathi post ‘NISHABDA’ can be found at this link:
which is kindly translated here in English by Jaya-Mohan.

Tuesday, November 23, 2010

They say that I was born 45 years ago on this same day! Amazing & Amusing!

I am neither body nor mind…. 
I have no references whatsoever.
I eternally prevail as...
Absolute Awareness.

I am like Space... Omnipresent,
never came... never left.
Rest is all... small talk.

I am neither body nor mind….
I have no references whatsoever.

I don't need to
take birth or face death.
I am Un-Divided…since Eternity.
I am neither body nor mind….
I have no references whatsoever.

Saint Tukaram testifies the Core Secret:
The Self is beyond action & inaction.
(Every action is but an impersonal action.)

I am neither body nor mind….
I have no references whatsoever.
I eternally prevail as...
Absolute Awareness.

_(Jai Guru)_
Love

-Nitin Ram
23 November 2010
Seeking ends here

Monday, November 08, 2010

सप्रेम शुभेच्छा

वेगळेपणाचा भास
हा तर सर्वात मोठा त्रास,
ज्याला होतो त्रास
तोच तर मूळ 'आभास'!

भास आहे हे जसे होते स्पष्ट,
त्रास... आपसुक आणि कायमचाच होतो नष्ट! :-)

सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम
०७ नोव्हेंबर २०१०

www.abideinself.blogspot.in
Being is ‘ease’ and becoming … a Dis’ease’.

Related posts:

'मी' कोण आहे? - एक सोप्पे कोडे!
http://abideinself.blogspot.in/2012/05/blog-post.html
जे सदैव तेच आत्मस्वरूप
http://abideinself.blogspot.in/2012/06/blog-post_30.html
'मी' कोण आहे? : मूळभूत प्रश्न
http://abideinself.blogspot.in/2012/03/blog-post.html
तो ‘तू’ नव्हे ! 
http://abideinself.blogspot.in/2011/09/blog-post_17.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे
http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
ह्या क्षणात 'स्थित' होणे शक्य आहे का...!!!
http://abideinself.blogspot.in/2011/07/blog-post.html
सत्य एकच आहे
http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post_04.html
सदगुरु म्हणजे सर्वस्व
http://abideinself.blogspot.in/2010/07/blog-post_12.html

Thursday, October 21, 2010

विश्राम



काय आहे 'तिथे' ...
जे आत्ता नाहीये 'इथे'!
कोण आहे 'तिथे'...
जो आत्ता नाहीये 'इथे'!!! :-)

-नितीन राम
२१ ऑक्टोबर २०१०

Being is 'ease' and Becoming ...a Dis'ease'.

Tuesday, October 12, 2010

सप्रेम आठवण

विसरलास रे तू विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

शब्दांमध्ये गुंतलास आणि निशब्दालाच विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

धावण्याकडेच लक्ष तुझे, मूळ 'मुक्काम' मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

चित्रांमध्ये रमलास आणि रिकामा कॅनव्हास मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

शब्द-अर्थाकडे लक्ष तुझे पण स्वार्थ (स्व-अर्थ) मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

शिक्षणात बुडून गेलास पण ह्या क्षणाला मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप`तू …फक्त विसरलास!

धारणांची रमी खेळताना हुकुमाचा राम मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

जिंकण्याच्या खेळामध्ये हारण्याची मौज घ्यायला विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

योग इत्यादि कार्यक्रमात, 'न झालेल्या' वियोगालाच विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू … फक्त विसरलास!

अनुभवांमध्ये रमता रमता, अनुभोक्त्याला मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

किनार्यां्वर खेळाच्या नादात, प्रवाहालाच विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

सुखांमागे धावता धावता, आत्मसुख तू …फक्त विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू … फक्त विसरलास!

कार्यकारणात गुंतलास आणि 'अकारण अस्तित्व' मात्र विसरलास,
विसरलास रे विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

जे 'क्षणिक' त्याची साठवण आणि जे 'कायम' त्याची नाहि आठवण,
विसरलास रे तू विसरलास, तुझे स्वरूप तू …फक्त विसरलास!

सप्रेम आठवण!

-नितीन राम
०९ ऑक्टोबर २०१०
www.abideinself.blogspot.com
Being is ‘ease’ and becoming … a Dis’ease’.

Thursday, September 30, 2010

The Real Title Suit!

The only Real Title Suit that is worth getting resolved is for the Title
“me”.
All the rest of the title suits resolved or unresolved…hardly matters!

All the rest of the title suits will enmesh and strengthen the Title ‘me’.
Whereas this Real Title Suit will surely unveil the Title ‘me’!

Best wishes :-)

-Nitin Ram
30 September 2010
http://www.abideinself.blogspot.com/

राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!



                                    राम हा कालचा सूत दशरथाचा, अनंत युगांचा आत्माराम!
                                 राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

                            त्या रामासी हा राम ठावे जरी असता, शरण का जाता वसिष्ठासी!
                               राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

                                      तुका म्हणे राम तुझा तुजपाशी, पुसुनी घेशी गुरुमुखे!
                               राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

                                                                     -नितीन राम
                                                                  ३० सप्टेंबर २०१०



Sunday, September 05, 2010

बंधू...तुला रे कसला मृत्यू! :-)

बीजातून आले फुल, फुलातून आला सुगंध;
फुल गेले कोमेजून, हा काय सुगंधाचा मृत्यू...!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

वेळूतून झाली बासरी, बासरीतून उठला नाद;
बासरी गेली तुटून, हा काय नादाचा मृत्यू....!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

आकाशात जमला ढग, ढगातून आला पाऊस;
ढग गेला बरसून, हा काय पाण्याचा मृत्यू...!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

मातीतून आली उदबत्ती, त्यातून पेटला अग्नि;
उदबत्ती गेली विझून, हा काय अग्निचा मृत्यू...!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

ऊसातून आली साखर, साखरेत आली गोडी;
साखर गेली संपून, हा काय गोडीचा मृत्यू.....!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू....!!

अन्नातून आला अन्नाचा देह,
अन्नरसाच्या गुणातून प्रकटले सत्व; 
सत्व नव्हे रे हे तर 'स्वत्व'... स्व्-तत्व!
देह-अन्न जाणारच ना रे सुकून,
पण हा काय स्वत्वाचा मृत्यू....!!! 
बंधू...तुला रे कसला मृत्यू....!!!!

जे नाहि त्याचाच रे मृत्यू,
जो आहेच त्याला कसला मृत्यू..!
जन्म-मृत्यूला जाता येता पहाणारा रे तू, 
बंधू...अरे, तुला रे कसला मृत्यू...!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!! :-)

सप्रेम
-नितीन राम
०५ सप्टेंबर २०१०
http://www.abideinself.blogspot.com/

***************

Saturday, September 04, 2010

नाद

नाद* नाहि करायचा, नाद**...फक्त ऐकायचा! :-)

जो सकारण येणार, तो कधीतरी जाणारच ना! जो अकारण आहेच, तो कोठे जाणार!

(*नादः जो विविध प्रक्रियांमुळे, सकारण उठतो तो आहत नाद, 
**नादः जो कायम, अकारण असतोच तो अनाहत नाद)

सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम

०४ सप्टेंबर २०१०

Saturday, August 21, 2010

Shower of Now

          Past is just…a minute old future, Ask me not how         
Let’s get drenched in this Shower of Now!

 Light is just…a minute old darkness, Ask me not how 
Let’s get drenched in this Shower of Now!

Fruit is…a minute old root, Ask me not how
Let’s get drenched in this Shower of Now!

Solution is…a minute old problem, Ask me not how
Let’s get drenched in this Shower of Now!

Visible is…a minute old invisible, ask me not how
Let’s get drenched in this Shower of Now!

Knowledge is…a minute old ignorance, Ask me not how
Let’s get drenched in this Shower of Now!

Waking dream is…a minute old sleeping dream, Ask me not how
Let’s get drenched in the Shower of Now!

Time is purely a concept; if you know it by now
You’ll get absorbed in this Shower of Now! :-)

You are indestructible anyhow, just know it here & now
You are this Shower of Now! You are this Shower of Now!:-)

Jai Guru
With Love,


Nitin Ram
20 AUGUST 2010


www.abideinself.blogspot.com  
    Being is ‘ease’ and Becoming…a dis'ease’
Also read:

Sunday, August 15, 2010

Independence Day

Let "all those" be relieved
from their
strongest belief/faith
that
"They are not Free and need Freedom"!

Best wishes on India's Independence Day.

Nattions can be at times
Dependent or Independent,
But....
YOU are Ever Independent...Ever Free!

-Nitin Ram

Thursday, August 12, 2010

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
"अर्जुन-पण" हे हृदयामध्ये इतके घट्ट कवटाळले गेले आहे कि त्यामुळे
कृष्णाची भगवत-गीता वर्षोंवर्षे फक्त बुद्धीतच (डोक्यातच) घुट्मळती आहे.

"अर्जुन-पणा"वर जरासा... 'प्रज्ञेचा प्रकाश' पडण्याचा अवकाश आहे कि
हृदयातून कृष्ण आपसुकपणे प्रकट होण्यास.......केव्हापासूनचा उत्सुक आहे....! :-)

सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम

१२ ऑगस्ट २०१०

Wednesday, August 04, 2010

सदगुरु नावाचा उलटा प्रवाह

सदगुरुंकडे मी
काहीतरी घ्यायला म्हणून गेलो,
तर त्यांनी माझा
'मी'च घेऊन टाकला!

सदगुरुंना मी
काहीतरी द्यायला म्हणून गेलो,
तर त्यांनी...त्यांचे
सर्वस्वच मला देऊन टाकले!

जय गुरु

सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम

04 OCT 2008

Tuesday, July 27, 2010

जन विजन झाले आम्हां...
जन विजन झाले आम्हां...
विठ्ठ्ल नामा प्रमाणे....
जन विजन झाले आम्हां!

जय सद्गुरु

Wednesday, July 21, 2010

हरि भजनाविण काळ जाऊच शकत नाहिये रे.......! :-)

हरि भजनाविण काळ घालवू नको रे!
हरि भजनाविण काळ घालवू नको रे!

दोरिच्या सापा भिऊन भवा, भेटी नाही जीवा शिवा;
अंतरिचा ज्ञान-दिवा मालवू नको रे!

हरि भजनाविण काळ घालवू नको रे!
हरि भजनाविण काळ घालवू नको रे!

विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोले;
आपुल्यामते उगीच चिखल कालवू नको रे!

हरि भजनाविण काळ घालवू नको रे!
हरि भजनाविण काळ घालवू नको रे!

संतसंगतीने उमज, आणुनी मनी पुरत समज;
अनुभवाविन मान हालवू नको रे!

हरि भजनाविण काळ घालवू नको रे!
हरि भजनाविण काळ घालवू नको रे!

सोयरा म्हणे ज्ञानज्योती, तेथे कैची दिवस-राती!
तयाविन नेत्रपाती हालवू नको रे!

हरि भजनाविण काळ घालवू नको रे!
हरि भजनाविण काळ घालवू नको रे!

हरि भजनाविण काळ जाऊच शकत नाहि रे.......! :-)

सप्रेम नमस्कार
जय गुरु

Friday, July 16, 2010

Seeking or the Understanding ?

Tranlsated from the original Marathi post: अभ्यास का बोध !?

 
Seeking is based on some reason,
Understanding is without any!

Seeking is with an effort & purpose,
Understanding is spontaneous & effortless!

Understanding is absent in the Seeking,
While the ‘Seeker’ (one who is trying to understand)
is absent in the Understanding!

Seeking consists of the seeker, seeking & the sought,
While only the Understanding of one’s Real Nature prevails in the Understanding!

Seeking/Search consists of the search, searcher & the searched,
Understanding denies the very ‘Searcher’!

Seeking consists of stages, intervals & may be some practices,
While the Understanding is Eternal...despite of them!

Seeking has an aim or objective,
while the nature of Understanding is itself aim-less!
Seeking is supported by listening, reading or pondering,
While the Understanding is Self-supporting (independent)!

Fear of forgeting the 'gathered knowledge' prevails in the Seeking,
While, even the thought of having understood is absent in the Undersatnding!

Background of Seeking is always... Duality,
While the Understanding is the groundless Non-Duality!

Seeking is an ever changing state,
Whereas Understanding …. the ‘stateless’ state!

In Seeking, lock exists and the search for the key happens,
While in the Understanding, the clear Understanding prevails that
the lock and the key were never separated (two)! :-)

With Love,
Nitin Ram
23 November 2009

*Understanding: Understanding without a separate understander.

Tuesday, July 13, 2010

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।

योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥

देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।

तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥

अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।

सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥३॥

 
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।

तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥


पुरे पुरे आतां प्रपंचा पाहणें ।

निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥

ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।

विठ्ठलीं निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥

Monday, July 12, 2010

सदगुरु म्हणजे सर्वस्व

सदगुरु म्हणजे सर्वस्व
सर्वच-स्व
सर्व- स्व
सर्वस्व... :-)

जय गुरु

सप्रेम नमस्कार.
-नितीन राम







Tuesday, July 06, 2010

"शब्दा"चे विसर्जन---तोच "निशब्द"

"शब्दा"चे विसर्जन---तोच "निशब्द"

निशब्दाचे मूल्...'शब्द', तर... शब्दाचे मूळ्...'निशब्द' ! 'शब्दा'ला दिसेल फक्त 'शब्द'च , तर.....निशब्दाला...फक्त 'निशब्द'! 'शब्दा'ला जसा 'निशब्दातही दिसतो फक्त शब्द...तसा 'निशब्दा'ला शब्दातही दिसतो फक्त 'निशब्द'! 'शब्दा'ला कसां बरं ओळखू येइल "निशब्द", झोपलेल्याला कधीतरी कळते का..कोण जागा झाला आहे ते… आणि तेही 'बुद्धीचा चश्मा' लावून !! इन-मिन पाच माणसे होती जी तेव्हा देहाकृतीतील कृष्णाच्या अनंत परब्रह्म स्वरुपाला ओळखत होती आणि बाकीची सर्व मात्र कृष्णाच्या आधीच्या देवतांचीच पूजा करत होती ना!!! आणि आता मात्र अनंत आहेत जी त्याची ईश्वर म्हणून पूजा करताहेत! गंम्मत आहे ना !! ;-)

'शब्दा'ला दिसतो जेव्हा 'निशब्दा'तील 'शब्द' आणि सुरु होते जमावलेल्या शब्दांची वळवळ....ऐकलेल्या, वाचलेल्या अनुभवरहीत 'शब्दांची' चुळबुळ! आणि मग 'शब्दाची' शब्दावरील 'अढळ भक्ती' कधी पाहूच शकत नाही 'निशब्द'! 'शब्दा'ला कायमच झोंबतो हा 'निशब्द' कारण शब्द जर राख तर "निशब्द" आहे चेतलेला अग्नि! 'शब्दा'साठी भय काय आहे तर समर्पणाचे ….नसलेले अस्तित्व मिटण्याचे!! मरतो कोण तर हाच जडबुद्धी 'शब्द' जो अनंत वाहणार्या 'निशब्दा'च्या प्रवाहात बुद्धीच्या किनारर्याला घट्ट पकडून बसला आहे. त्याला कधी लक्षातच येत नाही कि प्रवाहाला कायमच दोन किनारे असतात. एक ज्ञानाचा तर दुसरा प्रेमाचा, श्रद्धेचा, भक्तीचा ! एका किनार्याची वाहती नदी कधी कोणी पाहिली आहे का!!! गोलाकार अश्या एका किनार्याचे असते… ते स्थिर, मृतवत 'डबके'..त्यात प्रवाह नाही, जीवंतपणा नाही!

‘शब्द’ आहे कोरडे बीज जे कधी उमलतच नाही कारण उमलण्यासाठी लागतो ओलावा, प्रेमाचा. श्रद्धेचा! शब्दाला शब्द जोडला जातो फक्त आणि उरते फक्त शब्दांची बेचव, बेरस खिचडी, ज्याने कोणाचेच कधीच पोट भरलेले नाही! खिचडीची पाकक्रिया वाचून, पाठ करून, पुनरावृत्ती करून कधी कोणाचे पोट भरलेले ऐकलेले तर नाहि !!!!

एकूण काय तर ‘शब्दा’ला भय आहे हे मरणाचे......आणि मरण्याशिवाय वास्तविक "जन्म" कधीही कोणाचाही झालेलाच नाही ! 'शब्दा'ला जेव्हा कोठल्यातरी अज्ञात क्षणात झोंबतो हा 'निशब्द' तेव्हा होते एक जखम आणि 'शब्द' पुन्हा माहितीवजा शब्दांचे मलम लावून त्याला भरायचा असफल प्रयत्न करतो आणि उमलण्याचा एक सुंदर क्षण पुन्हा हातातून निघून जातो.

शब्दाला कायमच भय आहे 'निशब्दाचे. 'शब्दाला' भय आहे जखमेचे/पीडेचे आणि म्हणून तर तो 'निशब्दा'पासून लांब लांब पळत राहतो. पण श्रद्धेच्या अभावी त्याला दिसूच शकत नाही….
त्याला कधी ल़क्षातच येत नाही कि जखम करणारा हाच तर 'सदगुरु'! जखम करतो आहे असे जरी वाटले तरी तो वास्तविक जखम भरायचे काम करत असतो. नसलेल्या रोगाची जखम...अनावश्यक धारणांची, मान्यतांची जखम!
दिवाणखान्यात लटकवलेली...प्लैस्टिकच्या फुलांच्या 'शाश्वत' हाराने सुशोभित केलेली सदगुरुंची सुंदर तसवीर म्हणजे फक्त "सदगुरु" आहेत की काय !!!!! जेथे जेथे होते जखम/पीडा (शारिरीक नव्हे) तेथे तेथे …तेच सदगुरुंचे चरण! जखमेपासून लांब पळून पळून थकून नाही गेला का अजून हा 'शब्द'!!? शब्दांच्या ढाली घेऊन किती वेळ आणि कोठे कोठे पळत राहणार हा 'शब्द'!? जमवलेल्या शब्दांची पोती डोक्यावर घेऊन पुन्हा दारो-दारी नवीन शब्द गोळा करीत बोहारणीसारखा का फिरतो आहे हा 'शब्द'!!!

'शब्द' आणि 'निशब्दा'मधे अडथळा तरी काय आहे...अडचण काय आहे तर ती म्हणजे 'शब्दा'ची'..'शब्दा'वरील अढळ श्रद्धा! शब्दांच्या ढाली घेउन, शब्दांचे अलंकार घालून इकडे-तिकडे चौफेर पळणार्या 'शब्दा'ला कृष्णच काय...राम...बुद्ध...रमण...रजनिश...जीसस..निसर्गदत्त ह्यांसारखे "निशब्द"....काहीही करू शकत नाही. 'शब्दा'च्या अंगावरील अनंत भेगा, फटी त्यांना दिसत नाहीत असे नाही...पण जो पर्यंत 'शब्दा'मध्ये धाडस, धैर्य्, वास्तविक तहान, आंतरिक श्रद्धा.....दिसत नाही तो पर्यंत ते करुणेने वाट पहात राहतात. एकूण काय एका क्षणाचेच तर काम आहे...जशी शब्दाची शब्दावरील अढळ भक्ती स्वानुभवाने ढळणार तसे 'शब्दाचे' आपसुकच होणार विसर्जन, 'शब्दाचे' निशब्दाच्या पायी समर्पण.

वास्तविक 'जखम' हीच तर आहे 'औषधी'… हाच तर आहे खरां रामबाण उपाय !! जखम जेव्हा आंतरिक जाते तेव्हा तिच स्वतः औषध बनून प्रकट होते आणि मग कायमचाच रोग नाहिसा होतो आणि प्रकट होते खरे "स्वास्थ्य्".."स्व-स्थित" !!! :-)

सदगुरुकृपेने एका अज्ञात क्षणी...'निशब्दाच्या' अनंत, अथांग प्रवाहात वाहून जातो तो 'शब्द'....कायमचाच्...आणि उरतो फक्त "निशब्द"! आपलिची डोई आपल्या पायी! :-)

'शब्द' आणि 'निशब्दा'चा विस्तृत आणि व्यर्थ वाटणारी ही वायफळ चर्चा कशासाठी....! :-) शब्दातूनच सदगुरुकृपेने कधी कधी निघते एक वाट्..जी घेऊन जाते 'शब्दा'ला आपल्या मूळ 'स्वगृही'....'निशब्दा’मधे ! :-)

!जय गुरु!

सप्रेम

-नितीन राम

०५ जुलै २०१०

Monday, July 05, 2010

श्रद्धेवर श्रद्धा..तिच आत्मश्रद्धा !

श्रद्धेवर श्रद्धा..तिच आत्मश्रद्धा !

 
श्रद्धेच्या पानावर श्रद्धा दवबिंदू,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या पाण्यावर श्रद्धाची तरंग,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या आरशांत श्रद्धा प्रतिबिंब,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या हातावर श्रद्धाची रेषा,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या भूमिवर श्रद्धाच सावली,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या नभांत श्रद्धाची घननिळा,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या अग्नित श्रद्धा अग्निकण,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या 'गुरु'वृक्षावर श्रद्धा 'शिष्य'फळ,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या वार्‍यावर, श्रद्धाची सुगंध,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धा प्राण माझा, श्रद्धा प्राण तुझा,
श्रद्धेविण नाही कोणी देव दुजा!

सप्रेम

-नितीन राम

Friday, July 02, 2010

‘Love’ is the river….flowing in Reverse Mode!

NR: …………………………………………..:-)
Jagadhish: :-) Please say something.
NR: ……:-) You = Me
Jagadhish: Nitin, that’s so absurd and can’t be comprehended.

NR: lol……..ok. Disciple = Master. Is that simple now!
Jagadhish: Nitin, that’s even more absurd! lol
NR: lol Why is it so! It is such a simple spiritual mathematics. The mathematics of subtraction! The mathematics of Love!
Jagadhish: hm hm …… and how the equation gets solved!?

NR: Where is the ‘equation’! Ok. It is so Simple …The most natural subtraction…. Say spiritual subtraction which happens. ‘You = Me’, when seen as …….You – You = Me – Me     AND
‘Disciple=Master’, when seen as ……… Disciple - ‘Disciple hood’ = Master - Master,
Ends at ________ = _________ :-) ! Where is the equation now!!!
(Disciple-hood is the notion of being separate.)

Is there any necessity of using this = sign now………!!!! What remains is just ………… :-) Don’t phrase it in your mind with words like ‘nothingness’, ‘everything-ness’ based on what you have heard or read earlier otherwise you are going to miss IT again………………. :-)!
What prevails is the eternal, undeniable….flood of Love….‘Is-ness’, Gratefulness…Vastness…..Thankfulness….Satguru…Swaroopa....The nameless !!!
For Nitin it is the inexpressible love, gratefulness towards the Master (Satguru), which got unconcealed in to an unlimited flood! The initial love for the Satguru….faith in the Satguru, transcended in to its Real nature, the Real Love, Satguru, Swaroopa…! The Unlimited was just presumed as limited! You go on missing it because you think it is all about "Addition". That’s it!
Haven’t we arrived once again where we started……………………………:-) !!!!! lol
Jagadhish: ………………………………………………………lol Thank you so much!
NR: You are most welcome! Thank you! :-)

Jai Guru

Thursday, July 01, 2010

The obsession called.... Learning! :-)

Where did you learn breathing?

Where did you learn that you exist?

Where did you learn that you are born?

Where did you learn to get up?

Where did you learn to slip?

Where did you learn to dream?

Where did you learn to smile?

Where & when did you learn to live?

Where & when did you learn to love?

Did you really learn..... Who taught you... Which books or scriptures...!!!

Or.....  Are these the most naturally happening processes!! :-)

And now you are trying to learn, ‘who you are’....!!! lol

Now you think that you have learnt the art of thinking!!!!!

Excuse me...... do you feel that ‘you’ do all the thinking or it just the thoughts appearing and disappearing despite of this notional ‘you’!!! :-)

Best wishes,

Nitin Ram

01 JULY 2010



Wednesday, June 30, 2010

Spiritual Maths: 1 - 1 = ( 1 – 1 ) + ( 1 – 1 )

Politics can be of addition,
Addition of friendly allies!
Samsara is also nothing but addition,
Addition of more materials!
Religiousness also involves addition,
Addition of varied concepts & methods!
In all everything involves & revolves around Addition.. Collection!
How useful is that addition…..You know it better! :-)

Whereas Spirituality is always a Subtraction.
Subtraction of an apparent Everything-ness…
in to a residual, ever existing Nothingness!

Love n Regards,

Nitin Ram
30 JUNE 2012
Ps.: No IM* please.

*******************

आध्यात्मिक गणित : १ - १ = ( १ - १ )  +  ( १ - १ )

राजकारण... बेरजेचे,
समाजकारण... बेरजेचे,
संसार...बेरजेचा,
धार्मिकताही... बेरजेची;
एकूण काय सर्व गोळाबेरिजच !
राजकारणात आहे मित्रांची, शत्रूंची, समविचारी पक्षांची बेरिज,
समाजकारणात आहे समाजोपयोगी विचारांची बेरिज,
संसारात आहे धन, पद, प्रतिष्ठेची बेरिज,
तर....धार्मिकतेमधे आहे भयापोटी झालेली धार्मिक आचार्-विचारांची बेरिज,
एकूण काय तर सर्व गोळाबेरिजच!!
उपयोगी का निरुपयोगी.... ते तुम्हालांच माहीती..!!!! :-)

पण
अध्यात्म मात्र्..... कायमच वजाबकीचे......
वजा'बाकी' करून नंतर उरलेल्या (नुरलेल्या) बाकीचे !! :-)

अनंत शुभेच्छा!


नितीन राम

www.abideinself.blogspot.in
Whatever the question, Love is the Answer!

Monday, June 28, 2010

A "Truth"ful Joke !

I happen to read following text under the SMS Joke of the day section today, which represents the spiritual seekers in a broader perspective. ;-)

Dog: My owners feed me, love me, provide me with a nice house, and take good care of me. They must be Gods!
Cat: My owners feed me, love me, provide me with a nice house, and take good care of me. I must be the God!

Dogs or Cats as mentioned above, just represent the spiritual seekers in broader perspective. For either of them the journey on the pathless path begins from an assumed point: For the first (Dog) say Bhakta ....it starts with "YOU- Only YOU" - I am Nothing ( Not me ) whereas for the other (Cat) say Gyani...it starts with "ME- Nothing else- I am Everything ( I AM )...! :-)
 
With breaking of a Dream..during the course of this so called journey...The First wakes up at HOME with an understanding, "MYSELF- What is not me! I am Everything" and the other wakes up from a dream with an understanding," YOU-What is not you! I am Nothing"!. :-) The circle gets completed, when reaching HOME happens...(not from an external door)..waking up from a 'waking-state dream' happens! What is common in both the cases is "waking up from a dream". Does not matter what is the assumed beginning point 'cause it is alwyas a part of the dream including the dreamer!
 
Best wishes,

With Love,
 
Nitin Ram
28 JUNE 2010

Friday, June 18, 2010

एक धारणा: "किल्ली लावली की कुलूप उघडते"

एक धारणा: "किल्ली लावली की कुलूप उघडते"

अरे हो.....(कुलूप आणि किल्ली राहूद्यात) पण दार तरी कुठे आहे तिथे !!!! :-)

-नितीन राम

Monday, June 14, 2010

La duperie !

Recently one of the blog post was translated in French by a friend Laya. Her blog is a 'Wonder'full  non-dual blog in French & is worth visiting.
The original English blog posting titled "DEATH is the only Fallacy"
can be found on this link:
 *****

La duperie !
http://perlesdebonheur.blogspot.com/2010/05/nitin-ram-la-duperie.html



Q : Qu'est-ce que la Vérité ?

NR : ..................................... (silence)

Q: lol... OK.... Qu'est-ce que la Vérité ?

NR : ...................................... :-)

Q : Qu'est-ce que le Faux alors ?

NR : La "mort" est le faux, la non-vérité (a-satya) !

Q : Quelle est la Vérité finale ?

NR : Qui veut savoir ? Si tu pouvais méditer sur cela !

L'entité (non existante) qui veut savoir la Vérité est la plus grande duperie !
Q : Comment réaliser que c'est une duperie ? Que dois-je faire ?

NR : lol... Qu'as-tu été obligé de faire pour comprendre que tu existes? Fais la même chose !
Q : lol........ Merci !

NR : Tu es le bienvenu ! :-)

Saturday, June 12, 2010

‘कोण’ आहे इथे आगळा-वेगळा...... ज्याला ‘काहीही’ पाहिजे आहे?

या इथे.. जे काही आहे ...
दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त,
ह्यांत असे काय आहे...
जे मला पाहिजेयं ....
जे मी स्वतः नाहीये :-) !!!
या इथे.. जे काही आहे ...
दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त
ह्यांत असे काय आहे...
ज्याची मला भीती आहे...
जे मी स्वतः नाहीये :-) !!!

मग आतां.... ह्या क्षणामध्ये पहां...
की या इथे.. जे काही आहे...
दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त,
ह्यां मधले असे काय आहे हो...
जे तुम्हाला ‘अजून’ पाहिजेयं ....
आणि
जे तुम्ही स्वतः ‘आत्ता’ नाही आहांत! :-) !!!!!
असे काय आहे अजून
जे तुम्हाला अजून 'व्हायचंय'...
जे तुम्ही आत्ता नाही आहात..!!

‘कोण’ आहे इथे
आगळा-वेगळा असां......
ज्याला काहीही पाहिजे आहे :-) !
आहे का कोणी खरंच ...
का फक्त भ्रमच आहे....... :-)!!
तुम्हीच पहां ..... :-) !!
जय गुरु
सप्रेम शुभेच्छा
-नितीन राम

12 JUNE 2010