० x १ = ०
० x २ = ०
० x ३ = ०
० x ४ = ०
० x ५ = ०
० x १० = ०
'शून्याचा पाढा'...
रोज, किती वेळा पाठ करता....?
....कधीतरी 'पाठ' करता का रे........!???:-)
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
06 MARCH 2009
० x २ = ०
० x ३ = ०
० x ४ = ०
० x ५ = ०
० x १० = ०
'शून्याचा पाढा'...
रोज, किती वेळा पाठ करता....?
....कधीतरी 'पाठ' करता का रे........!???:-)
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
06 MARCH 2009
14 comments:
kindly translate them in english so tht others can enjoy too .
:-) Thanks .......
"TABLE OF ZERO"
0 X 1 = 0
0 X 2 = 0
0 X 3 = 0
0 X 4 = 0
0 X 5 = 0
0 X 10 = 0
Tell me how often in a day do remember this "Table of Zero"..??
Do you atall byheart it..?? Any need to byheart it..!!!!!!
Once Recognised.....FULL STOP.
Morning Cheers...:-)
excellent expression
regards,
-joy
मला काहीच कळले नाही .......
जिथे आरंभ शून्य ....अंत शून्य ....तिथे पाठ काय करावे ? पाठ करणाराही शून्य आणि पाठ ही शून्य ! जग हे मोठे शून्य ! माझे उत्तर शून्य ....
-मोहिनी
काही समजले नाही राव.. जरा विसकटून सांगा बरे !
-राज जैन
धन्यवाद :-)
'अभ्यास' म्हणजे... बोधाचा फक्त आभास, तर
'बोध' म्हणजे... सतत, सहज, अनायास असा ... "आत्मबोध" !
'बोध' म्हणजे... शोधाचा कायमचा अंत आणि शोध घेणार्याचाही अंत.
'बोध' म्हणजे... शोध आणि शोधणारा ह्या द्वयीचा अंत.
'बोध' म्हणजे... दुखःचा अंत आणि सुखाचाही अंत.
'बोध' म्हणजे... कोठल्याही पाठाचा अंत आणि पाठ करणार्याचाही अंत.
'बोध' म्हणजे... आरंभाचा अंत आणि अंताचाही अंत.
'बोध' म्हणजे... जन्म आणि मृत्यू ह्या संकल्पनेंचा कायमचा अंत.
'बोध' म्हणजे... अभ्यासाचा अंत आणि अभासकाचाही अंत.
'बोध' म्हणजे... द्वैताचा अंत नव्हे तर... द्वैत धारणेवरील श्रद्धेचा अंत.
'बोध' म्हणजे... जे काही... 'कळले' असे वाटते आहे त्याचा अंत.
'बोध' म्हणजे... कोठल्याही आधाराचा अंत.
'बोध' म्हणजे... आपल्याच अनंत आणि निराधार स्वरुपाचा बोध.
'बोध' म्हणजे... कोठल्याही पाढ्याशिवायचा.... शून्याच्या पाढ्यासारखा बोध :-)
सप्रेम नमस्कार
http://abideinself.blogspot.com/2009/11/blog-post_23.html
नेति नेति
-मोहिनि
धन्यवाद :-)
शब्दांची बंधने आणि शब्दांवरील भक्ती,
मिळाली आहे कारे तुला व्यर्थ धारणांमधून मुक्ती !
शब्दांच्या गाद्या आणि शब्दांचेच लोड,
"स्वस्थ" वाटत नाहीये ना..मग आता तरी सोड !
शब्दांचा संग आणि शब्दांचेच रंग,
शब्दांच्या 'अलिकडचा' आहे निशब्दाचा संग !
शब्दांची वळणे आणि शब्दांच्याच वाटा,
"स्वगृहा"पासून लांब लांब नेतात ह्या वाटा !
बाकी..... निशब्दः http://abideinself.blogspot.com/2010/03/blog-post.html
नि:शब्द बोध हा शब्दात मांडीला.......
शून्याचा खेळ हा गणितात बांधिला
अगणित शब्द संपले तेथे
शून्याचाच बोध पुन्हा उठे येथे........
हाच पाढा जीवनाचा ......
कांगावा का उगाच दु;खाचा.......
बोधातीत बोध मनाचा ........
शून्यात लय सुख दु:खाचा........
शून्यात लय शून्याचा
संपले शून्य उरले शून्य .....
जीवन भरले आज शून्य .....
-मोहिनी
कांगावा शब्द इथे अयोग्य वाटतोय....विचार का उगाच दु:खाचा ........हे अर्थपूर्ण वाटतय.
-मोहिनी
:-) एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध, अभ्यासातून झालेला बोध, शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेल मधील मेनूकार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थांची पाकक्रीया पाठ होण्यासारखे आहे. ह्यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते पण "भूक" मात्र नक्कीच भागत नाही. विविध शात्रांचा, ग्रंथांचा अभ्यास जास्तीच जास्त काय देउ शकतो तर.. पांडित्याची एखाधी मोट्ठी पदवी किंवा एखादा ज्ञानपीठ सारखा पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा. पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही... त्याने आपल्याला आपल्या 'कायम' स्वरुपाचा बोध मात्र नाही मिळत. जे बुद्धीच्या अलिकडचे आहे ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय कळणार !! "भूक" कायमची न-भागल्यामुळे, मग पांडित्याच्या आधारावर चालू राहते अजून अजून पाठांतर, अजून अभ्यास, अजून शब्दांची जमवा-जमव, विविध वैशिष्ठ्यपूर्ण मेनूकार्डचे वाचन आणि पाठांतर...आणि स्वाभाविकपणे त्याबरोबर सोबत मुफ्त मिळतात नव-नवीन दुखः नव-नवीन बंधनरूपी आभूषणे. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... वास्तविक "ज्ञान आणि अज्ञानाच्या अलिकडे व पलिकडे" असलेल्या आपल्या खर्या कायम स्वरुपापर्यंत कधीच पोचू शकत नाही. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... फक्त मूळ सदवस्तूकडे... स्वरूपाकडे निर्देष करण्यापर्यंतच कामाचे आहे हे "जाणले" तरी स्वरूपबोध "उघड होण्यास" यत्किंचीतही वेळ लागू शकत नाही.
दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध... स्वरुप-बोध... जो आहे अनायास.. आपसूक... निरावलंब... निराधार.
येथे आहे सहज विश्रांती :-)
सप्रेम नमस्कार
विश्रामः http://abideinself.blogspot.com/2010/10/blog-post_21.html
Nitin! Salutations .......gr8........i don think these things can be written by study but it's the true experience ( about the zero.......) may i kno more abt u.......
-मोहिनि
27/12/2010 - 19:43
येथे कोणीही आगळा-वेगळा असां नाहिच्चे...जो ग्रेट वैगेरे आहे. येथे आहे फक्त ग्रेट्नेस...व्हास्टनेस...अवेअरनेस..जे माझे, तुमचे आणि सर्वांचेच "स्वरूप" आहे.
नदीला कधीतरी तहान लागते का ! नदीला कुठे कधी थांबावेसे वाटते का ! नदीला कळत पण नाही कि ती कशी कोठे आणि का वाहते आहे! तशीच काहिशी ही अवर्णनीय अवस्था आहे ज्यात कळतेपण पण नाही आणि अ-कळतेपण पण नाही......जेव्हा जे जे हवे आहे तेव्हा ते ते सहजपणे येते आहे किंवा जाते आहे. येणारे पण आपण नाही आणि जाणारे पण आपण नाही. आहे काय तर फक्त जाणार्या आणि येणार्याचे 'जाणतेपण'! जे कधीच कोठूनही आलेले नाही आणि कधीच कोठे जाणार पण नाही. जे जे येते आहे किंवा जाते आहे असे दिसते आहे ते-ते....तो-तो सर्व भ्रम..आभास! केवळ क्षणिक आभास्...मग हा 'क्षण' कधीतरी पन्नास वर्षांचा असेल तर कधीतरी शंभर वर्षांचा. पण आपले "स्वरूप" जे सत्य-नित्य आहे ते ह्या छोट्या-मोठ्या क्षणांवर कद्यपिही अवलंबून नाही...ते आहे निरंजन... निरावलंब... निरंतर!
सद्गुरुंची कृपा आहे...जी अनंत आहे…अव्यहत आहे…वाहतेच आहे... आणि त्याचेच दुसरे नांव आहे "स्वरुप'.
जय गुरु _()_
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
Dear Nitin,
Sadgurukrupe sarakhe sunder.
Jai Guru.
-Jaya-Mohan
Post a Comment