Search AbideInSelf

Total Pageviews

Sunday, September 05, 2010

बंधू...तुला रे कसला मृत्यू! :-)

बीजातून आले फुल, फुलातून आला सुगंध;
फुल गेले कोमेजून, हा काय सुगंधाचा मृत्यू...!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

वेळूतून झाली बासरी, बासरीतून उठला नाद;
बासरी गेली तुटून, हा काय नादाचा मृत्यू....!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

आकाशात जमला ढग, ढगातून आला पाऊस;
ढग गेला बरसून, हा काय पाण्याचा मृत्यू...!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

मातीतून आली उदबत्ती, त्यातून पेटला अग्नि;
उदबत्ती गेली विझून, हा काय अग्निचा मृत्यू...!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!!

ऊसातून आली साखर, साखरेत आली गोडी;
साखर गेली संपून, हा काय गोडीचा मृत्यू.....!!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू....!!

अन्नातून आला अन्नाचा देह,
अन्नरसाच्या गुणातून प्रकटले सत्व; 
सत्व नव्हे रे हे तर 'स्वत्व'... स्व्-तत्व!
देह-अन्न जाणारच ना रे सुकून,
पण हा काय स्वत्वाचा मृत्यू....!!! 
बंधू...तुला रे कसला मृत्यू....!!!!

जे नाहि त्याचाच रे मृत्यू,
जो आहेच त्याला कसला मृत्यू..!
जन्म-मृत्यूला जाता येता पहाणारा रे तू, 
बंधू...अरे, तुला रे कसला मृत्यू...!!
बंधू...तुला रे कसला मृत्यू...!! :-)

सप्रेम
-नितीन राम
०५ सप्टेंबर २०१०
http://www.abideinself.blogspot.com/

***************

12 comments:

Anonymous said...

उत्कृष्ट !

धन्यवाद !

-नन्दकाका

Anonymous said...

Excellent composition, sir -

Beingness was 'understood' as beyond the food body and even the mind. But what has got me finally out of the 'readingness' phase is being this as ones' day to day primal identity. 'Reading' becomes totally distracting now....a lot of gratitude to all the masters..

Best Regards,
Shirole

Anonymous said...

Thanks Brother....My Heart started flying...it's a Nectar Of Imortality...!
I Love U Brother...For reminding my ''Swabhav''.

-Best Wishesh & Blessings.
Keep Rocking ,Brother.
-Santosh.

Anonymous said...

Fantastic & Amazing.
Thank you so much
for this simplest and yet
the most profound pointer ever heard.

many regards,

-jagadeesh

Anonymous said...

अप्रतिम, अद्वितीय, अलौकीक.

ज्याचे वर्णन करता करता शब्द थकून जातात, मन हरवून जाते, त्या अवर्णनीयाला शब्दामध्ये फक्त निशब्दच बांधू शकतो. या पूर्वी लिहिलेले तुमचे "निशब्द" हे ही इतकेच सुंदर होते.

इतके सरल, सहज, स्पष्ट 'स्वरुप' का उघड होत नाही ह्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. सप्रेम नमस्कार.

-दिलीप

Anonymous said...

nice :-)

thanks

-Sujal
INDIASPIRITUALITY BLOG

Anonymous said...

excellent wonderful
many thanks

Anonymous said...

फारच भितीदायक ब्लॉग आहे हा. आत्ताशी कोठे काहेतरी कळायला लागले असे वाटत होते आणि येथे आल्यावर मात्र सर्व काही विरघळून जाते आहे असे वाटते आहे. सांगता येत नाही आणि न सांगता राहवतही नाही.

Nitin Ram said...

धन्यवाद!

हो हा ब्लॉग भितीदायक आहे... आणि भितीनाशक पण! :-) जेथे जास्त भीती आहे तेथेच जास्तीच जास्त संभावना पण आहे...संभावना आहे भीती कायमचीच नष्ट होण्याची. खरी गंम्मत अशी आहे की मृत्यू आणि सत्य हे दोन्ही एकाच पांघरुणाखाली सापडतात. जो पर्यंत पांघरुण असते किंवा आहे असे वाटते तो पर्यंत मृत्यूचे भय असते आणि हे धारणारुपी पांघरुण उघडे पडताच भय कायमचेच नाहीसे होते, मृत्यू म्हणजे एक विनोद ठरतो आणि उरते ते फक्त अंतिम सत्य.... म्हणजे आपलेच सत्य-नित्य आणि निराधार स्वरूप!

सप्रेम

Sanjeev Pradhan said...

"जे नाहि त्याचाच रे मृत्यू,
जो आहेच त्याला कसला मृत्यू..!"

Atee-sunder. :-)Dhanyawad

Manasi said...

Thanx.
It`s 2 real and so it`s 2 good!
love n regards

-Manasi

Nitin Ram said...

Thank you... Jai Guru _()_