Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, September 29, 2011

आहे कोणी तयार इथे...?


जेथे दिव्याला प्रकाश मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे पाण्याला ओलावा मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे हवेला गारवा मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे फुलाला सुगंध मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे घंटेला नाद मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे तुला तुझा 'स्व'भाव मिळ्तो, तेथे तुझी मी वाट पहातोय!

हातातला हा 'गुरुप्रसाद' घ्यायला, आहे कोणी तयार इथे...!?
स्वतःच स्वतःच्या मूळाशी जायला, आहे कोणी तयार इथे...!? :-)

जय गुरु

सप्रेम नमस्कार
 
-नितीन राम
१३ सप्टेंबर २०११

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

1 comment:

Jai-Mohan said...

Dear Nitin
Dona vicharanchaya madhe jo thambala to,,
" Shwasanchya " " " "
Band Dolyat jo ramala to.

Love.Jaiguru.