एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध, अभ्यासातून झालेला बोध, शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेल मधील मेनूकार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थांची पाकक्रीया पाठ होण्यासारखे आहे. ह्यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते पण "भूक" मात्र नक्कीच भागत नाही. विविध शात्रांचा, ग्रंथांचा अभ्यास जास्तीच जास्त काय देउ शकतो तर.. पांडित्याची एखाधी मोट्ठी पदवी किंवा एखादा ज्ञानपीठ सारखा पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा. पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही... त्याने आपल्याला आपल्या 'कायम' स्वरुपाचा बोध मात्र नाही मिळत. जे बुद्धीच्या अलिकडचे आहे ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय कळणार !! "भूक" कायमची न-भागल्यामुळे, मग पांडित्याच्या आधारावर चालू राहते अजून अजून पाठांतर, अजून अभ्यास, अजून शब्दांची जमवा-जमव, विविध वैशिष्ठ्यपूर्ण मेनूकार्डचे वाचन आणि पाठांतर...आणि स्वाभाविकपणे त्याबरोबर सोबत फुकट मिळतात नव-नवीन दु:ख, नव-नवीन बंधनरूपी आभूषणे. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... वास्तविक "ज्ञान आणि अज्ञानाच्या अलिकडे व पलिकडे" असलेल्या आपल्या खर्या कायम स्वरुपापर्यंत कधीच पोचू शकत नाही. हे शाब्दिक 'माहितीवजा ज्ञान'... फक्त मूळ सदवस्तूकडे... स्वरूपाकडे निर्देष करण्यापर्यंतच कामाचे आहे हे "जाणले" तरी स्वरूपबोध "उघड होण्यास" यत्किंचीतही वेळ लागू शकत नाही.
दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध... स्वरुप-बोध... जो आहे अनायास.. आपसूक... निरावलंब... निराधार. येथे आहे सहज विश्रांती ! :-)
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
Few suggestive posts:
सत्य’ एकच आहे: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post_04.html
"बोध" म्हणजे काय...!: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
विश्रामः http://abideinself.blogspot.com/2010/10/blog-post_21.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे: http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post.html
बोध म्हणजे नक्की काय ?: http://abideinself.blogspot.in/2011/02/blog-post.html
9 comments:
नितिन राम,
नमस्ते. बोधाबद्दल सोप्या भाषेत आपण समजावून दिले आहे. बोध हां आपण सतत बुद्धित साठवण्यापलिकडे स्वरुप बोधाचा उलगडा होण्यास मदत होते हे आपल्या निवेदनावरून उघड
होत आहे ह्याची जाणीव आपण चांगल्या शब्दात उदृत केलि आहे. आपणाला लिहिणे सहज जमते
आणि असेच सतत लिहित रहावे. जय सद्गुरु! सर्वांना यथायोग्य
-नंदा काका
superb dear...
love u..!
Dear Nitin,
Subodh & sunder. We are in Lonavala. You all are welcom. Love, Jai-Mohan.
Very right, Sir - all effort to 'know' is the action of the unreal 'me'. There is only consciousness/awareness - and no one to 'know it from the outside as it were. I like the way Karl Reinz puts it - conciousness itself is self-enquiry.
Best Regards,
एखाद्याचा बोध निव्वळ शाब्दिक नाही हे समजण्याचा नेमका निकष नाही. त्यामुळे साक्षात्काराचे दाखले देत वावदूकाने विद्वानांची थट्टा करावी असा प्रघात रूढ होतो आहे(उदा. ओशो). असो. लेख आवडला.
धन्यवाद अज्ञात मित्र! आपल्या ह्या वैयक्तीक मत प्रदर्शनाबद्दल आभार आणि आपले येथे सप्रेम स्वागत. हा ब्लॉग सर्वांसाठी आपापले दृष्टीकोन मांडण्यासाठी मोकळा आहे.
सत्याचा कधीही आणि कोठलाही आग्रह असू शकत नाही. असत्याचा मात्र कायमच कोठलातरी आग्रह असतो अन्यथा असत्याच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह् लागू शकते. सत्याचा निकष लावणे स्वाभाविकच अशक्य आहे कारण हा निकष लावणार तरी कोण! "सत्य" स्वतःचेच स्वरूप म्हणून कायमचे उघड झाल्याशिवाय ते शक्य नाही. पण गंम्मत आशी आहे की हे उघड झाल्यावर एकतर त्याचा निकष लावायची गरजच मुळी ऊरत नाही आणि दुसरे म्हणजे कोणी त्याचा निकष लावायला जरी गेले तरी त्याचे देखील दु:ख वाटत नाही :-)!
पुनश्चः आभार आणि सप्रेम नमस्कार!
नितीन रामजी, सप्रेम नमस्कार आणि धन्यवाद. आणखी थोडे मत प्रदर्शन करतो. आग्रह कसलाच नाही. प्रकाशित करण्यायोग्य वाटले तर अवश्य प्रकाशित करा.
१. अध्यात्माचा 'मी आणि माझी मुक्ती' आणि बोध होणे, ज्ञान होणे इतकाच मर्यादित, संकुचित पाया नाही. त्यापुढे भगवद्गीता ३.२५ - ३.२६ हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण लक्षात कोण घेतो? त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली सगळीकडे तथाकथित 'अपनी धून मे मस्त' धीन्गाड्या 'मुक्तात्म्यांचा' धिंगाणा चालू आहे.
२. सत्याचा बोध झालेला नैतिक आणि अनैतिक याच्या पलीकडे असतो हे तत्वत: खरे आहे. पण असे देही असोनी विदेही उन्मनी मुक्तात्मे विरळेच असतात. त्यामुळे परिपूर्ण धर्मविचारात निव्वळ अमूर्त संकल्पना, 'फक्त बोध हवा, बास' इतकेच पुरेसे नाही. त्याची परिणती कळत नकळत सामान्यांचा बुद्धिभेद होणे, देव देश आणि धर्म यासाठी कार्य करणार्यांचे नाहक अवमूल्यन होणे आणि बसल्या जागी विश्वात्मक बुद्धी करत भोगलोलूप, पिसाट, धूर्त, आणि बोलबच्चन दुकानदारांनी अध्यात्मातले अध्वर्यू म्हणून मिरवणे यात होते. असो.
पुन:श्च्च धन्यवाद आणि आपले हार्दिक स्वागत.
http://abideinself.blogspot.com/2011/03/blog-post_10.html
सप्रेम नमस्कार!
Dear Nitin,
http://abideinself.blogspot.com/2011/03/blog-post_10.html
This link in reply to the Unknown friend is not accesible now. Why this link (post)is removed from the blog?
I read it once and found it extremely meaningful with deeper insight. Could you please upload this post once again?
Thanks
Post a Comment